मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /तेजस्विनीनं वाढदिवशी दिलं सरप्राईज; केली नव्या वाटचालीची मोठी घोषणा

तेजस्विनीनं वाढदिवशी दिलं सरप्राईज; केली नव्या वाटचालीची मोठी घोषणा

क्लॉथिंग ब्रँड नंतर आता तेजस्विनीने वेगळ्या दिशेने वाटचाल सुरू केली आहे.

क्लॉथिंग ब्रँड नंतर आता तेजस्विनीने वेगळ्या दिशेने वाटचाल सुरू केली आहे.

क्लॉथिंग ब्रँड नंतर आता तेजस्विनीने वेगळ्या दिशेने वाटचाल सुरू केली आहे.

मुंबई 23 मे: मराठी सिनेसृष्टीतील एक ग्लॅमरस अभिनेत्री अशी तेजस्विनी पंडीतची (Tejaswini Pandit) ओळख आहे. अनेक चित्रपटांतून तिने आजवर प्रेक्षकांचं मन जिंकलं आहे. अभिनयसोबतच अनेक गोष्टींमध्ये तिचा सहभाग पाहायला मिळतो. नुकतच तिने कोरोना रुग्णांसाठी प्लाझ्मा दान (Plasma donation)  केलं होतं. त्याचे काही फोटो तिने सोशल मीडियावर पोस्ट केले होते. तर आता तिच्या वाढदिवशी तिने चाहत्यानां एक सरप्राईज दिलं आहे. त्यामुळे अनेकांन आनंदाचा धक्का बसला आहे.

तेजस्विनी ही अभिनयाव्यतिरिक्त एक फॅशन डिझायनर देखिल आहे. ‘तेजाज्ञा’ हा तिचा क्लॉथिंग ब्रँड देखिल आहे. अभिनेत्री अभिज्ञा भावेसोबत (Abhidnya Bhave) मिळून तिने या ब्रँड ची निर्मिती केली होती. उत्तम साड्या या ब्रँड मार्फत बनवल्या जातात.

‘सुंदरा मनामध्ये भरली’ मध्ये आला नवा टर्न; लतिकाची सैराट एन्ट्री पाहून अभ्या झाला फिदा

तर आता तेजस्विनीने दुसऱ्याही एका दिशेने वाटचाल सुरू केली आहे. तिने आता चित्रपट निर्मितीसाठी काम करयाचं ठरवलं आहे. आणि त्यासाठी तिने तिच्या नव्या प्रोडक्शन हाऊसची घोषणा केली आहे.

क्रियेटिव्ह व्हाईब (Creative Vibe) अस या प्रोडक्शन हाऊसचं नाव असून तेजस्विनीने तिचा मित्र संतोष खेर याच्यासोबत हे सुरू केलं आहे. सोशल मीडियावर पोस्ट करत तिने सगळ्यानांच चकित केलं आहे. त्यामुळे ता एक उत्तम अभिनेत्री असण्यासोबतच ती एक निर्माती देखिल बनत आहे.

तेजस्विनीच्या या घोषणेनंतर तिला अनेकांनी शुभेच्छा दिल्या आहेत. अनेक सेलिब्रिटींनीही तिचं अभिनंदन केलं आहे. ‘अग्गबाई अरेच्चा’ (Aggabai Areccha) या चित्रपटातून तेजस्विनीने मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं होत. त्यानंतर अनेक हीट चित्रपटांत ती दिसली होती. ‘सिंधुताई सकपाळ’ (Mi Sindhutai Sakpal) या चित्रपटातील तिची भूमिका विशेष लोकप्रिय ठरली होती. तिला अनेक पुरस्कारही मिळाले होते.

First published:

Tags: Marathi entertainment, Tejaswini pandit