मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /मोफत लसीकरण केले म्हणून जनतेवर कोणताही कर नाही, थोरातांची मोठी घोषणा

मोफत लसीकरण केले म्हणून जनतेवर कोणताही कर नाही, थोरातांची मोठी घोषणा

 'माझं एक वर्षाचा मानधन मी मुख्यमंत्री सहायता निधीला देणार आहे. माझ्या काँग्रेसच्या सर्व आमदारांचा एक महिन्याच्या पगार सुद्धा..'

'माझं एक वर्षाचा मानधन मी मुख्यमंत्री सहायता निधीला देणार आहे. माझ्या काँग्रेसच्या सर्व आमदारांचा एक महिन्याच्या पगार सुद्धा..'

'माझं एक वर्षाचा मानधन मी मुख्यमंत्री सहायता निधीला देणार आहे. माझ्या काँग्रेसच्या सर्व आमदारांचा एक महिन्याच्या पगार सुद्धा..'

मुंबई, 29 एप्रिल : राज्यात कोरोनाची दुसरी लाट आली आहे. कोरोनावर मात करण्यासाठी लसीकरणावर भर दिला आहे. महाविकास आघाडी सरकारने 18 वर्षांपुढील सर्वांना मोफत लस (Free vaccination) दिली जाणार आहे. लसीकरण मोफत करण्यात आले असले तरीही कोणताही कर जनतेवर लादणार नाही, अशी घोषणा राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी केली आहे.

मुंबईत पत्रकारांशी बोलत असताना बाळासाहेब थोरात यांनी राज्यातील कोरोनाची परिस्थिती आणि लसीकरणाबाबत भूमिका मांडली आहे.

देशात आणि राज्यात कोरोनाच गंभीर संकट आहे. या परिस्थितीला आपण सामोरं जात आहोत. लसीकरण बाबत आग्रही आहोत. सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांनी मोफत लसीकरणाचा आग्रह होता. याबद्दल महाआघाडीचे देखील एक मत होतं. लसीकरणासाठी राज्याला मोठा खर्च आर्थिक भार येणार आहे. पण, लसीकरण खर्चाबाबत नवा  अतिरिक्त कुठलाही टॅक्स लावणार नाही,असं बाळासाहेब थोरातांनी स्पष्ट केले.

तसंच, 'माझं एक वर्षाचा मानधन मी मुख्यमंत्री सहायता निधीला देणार आहे. माझ्या काँग्रेसच्या सर्व आमदारांचा एक महिन्याच्या पगार मुख्यमंत्री निधीला देणार आहे, अशी माहितीही थोरात यांनी दिली.

सीरम संस्थेचे अदर पुनवला हे आता जागतिक केंद्रबिंदू बनले आहेत, त्यांना वाय सिक्युरिटी देण्यात आली आहे, असंही बाळासाहेब थोरात यांनी सांगितलं.

18 ते 44 या वयोगटातील सर्वांना लस मोफत

महाविकास आघाडी सरकारने 18 ते 44 या वयोगटातील सर्वांना कोविड प्रतिबंधात्मक लस मोफत (Free vaccination for Maharashtra citizens) देण्याचा निर्णय  राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. बैठकीनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी याची घोषणा केली.

'गेल्या वर्ष-सव्वा वर्षांपासून आपण कोविडची लढाई लढतो आहोत. जानेवारीपासून केंद्राच्या सहकार्याने राज्यात लसीकरण सुरू आहे. आजतागायत 45 च्या पुढील वयोगटातील दीड कोटीपेक्षा जास्त जणांचे लसीकरण करण्यात आले आहे. हा देशात विक्रम आहे, असंही मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले.

'18 ते 44 वयोगटातील लसीकरण कार्यक्रमाचे नियोजन करताना कुठलीही अडचण येणार नाही याची काळजी घेण्याची मुख्यमंत्र्यांनी प्रशासनाला सूचना केली आहे. या वयोगटातील नागरिकांनी  कोविन मोबाईल अॅपवर नोंदणी करावी, कुठेही लसीकरण केंद्रांवर गर्दी करू नये. लसीकरणाबाबत व्यवस्थित व सुस्पष्ट सूचना मिळतील. असेही मुख्यमंत्री म्हणाले.

First published:

Tags: Cm, Corona vaccination, Maharashtra, Mumbai, Uddhav thacakrey