महाराष्ट्राचं राजकारण सोडून दिल्लीत जाणार का? देवेंद्र फडणवीसांनी दिलं हे उत्तर!
महाराष्ट्राचं राजकारण सोडून दिल्लीत जाणार का? देवेंद्र फडणवीसांनी दिलं हे उत्तर!
'पूर्वी राज्यातल्या एखाद्या नेत्याला राष्ट्रीय स्तरावर काम करण्याची संधी मिळाली तर सर्व त्याचं अभिनंदन करत असत. आता संकुचित राजकारण झालं आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात खूप काही करायचं आहे.'
मुंबई 25 सप्टेंबर: माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते देवेंद्र फडणवीस यांना पक्षाने बिहार विधानसभा निवडणुकीचं प्रभारी पद दिलं आहे. तेंव्हा पासून फडणवीस हे आता राष्ट्रीय राजकारणात जाणार का? याची चर्चा सुरू आहे. फडणवीस हे दिल्लीत जाणार असल्याचंही बोललं जातं आहे. त्या सगळ्या चर्चेवर देवेंद्र फडणवीस यांनी आपली भूमिका स्पष्ट केलं. दिल्लीत न जात आपल्याला महाराष्ट्रातच राजकारण करायचं आहे असंही त्यांनी दैनिक ‘लोकमत’ला दिलेल्या मुलाखतीत स्पष्ट केलं.
फडणवीस म्हणाले, पूर्वी राज्यातल्या एखाद्या नेत्याला राष्ट्रीय स्तरावर काम करण्याची संधी मिळाली तर सर्व त्याचं अभिनंदन करत असत. आता संकुचित राजकारण झालं आहे. आमच्या पक्षातही पीढी बसलली आहे. पूर्वी अरुण जेटली, अनंतकुमार यांच्यासारखे नेते ही जाबाबदारी सांभाळत होते. आता पक्षाने माझी निवड केलीय.
बिहारच्या निवडणुकांसाठी मी काम करणार असलो तरी महाराष्ट्राचं राजकारण सोडून जाण्याचा प्रश्न उद्भवत नाही. महाराष्ट्राच्या राजकारणात खूप काही करायचं आहे असंही त्यांनी स्पष्ट केलं.
पंतप्रधान मोदींपेक्षाही या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांचा पगार आहे जास्त
आपल्या कामाच्या धडाकेबाज स्टाईलसाठी प्रसिद्ध असलेले तुकाराम मुंढे यांची नागपूरहून झालेली बदली चर्चेचा विषय ठरली होती. भाजपचं वर्चस्व असलेल्या महानगर पालिकेवर वचक ठेवण्यासाठीच त्यांना पाठवलं गेलं असंही बोललं जातं होतं. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यावरही आपली भूमिका स्पष्ट केली.
फडणवीस म्हणाले, मला त्रास देण्यासाठीच त्यांची नियुक्ती केली जरी असेल तरी माझ्यावर काहीही परिणाम झाला नाही. याचं कारण म्हणजे माझी दोन नंबर्सची कामे नाहीत. त्यामुळे तुकाराम मुंढे काय किंवा अन्य कुणीही आला तरी मला फरक पडत नाही. हे सरकार सुडाचं राजकारण करते आहे असा आरोपही त्यांनी केला.
अजित पवारांनी डिलीट केलं 'ते' ट्वीट; म्हणाले, कधी कधी वरिष्ठांचं पण ऐकावं लागतं
मीडिया, विरोधीपक्ष, सोशल मीडिया यावर आपल्या विरोधात कुणी बोलूच नये असं सरकारला वाटतं. कुणी विरोधात बोलले तर त्याच्या मागे बीएमसीला लावलं जातं. महाराष्ट्रात असं सुडाचं राजकारण कधी झालं नाही, असं मतही त्यांनी व्यक्त केलं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.