Home /News /national /

पंतप्रधान मोदींपेक्षाही या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांचा पगार आहे जास्त

पंतप्रधान मोदींपेक्षाही या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांचा पगार आहे जास्त

आपल्या देशात सर्वांत जास्त पगार राष्ट्रपतींना असतो, असा आपला गैरसमज असेल तर तो बदला. देशाचा गाडा हाकणाऱ्या पंतप्रधानांनाही काही मुख्यमंत्र्यांपेक्षा कमी वेतन मिळतं. पाहा उद्धव ठाकरे आणि नरेंद्र मोदी यांना मिळणाऱ्या मानधनातला फरक..

पुढे वाचा ...
    नवी दिल्ली, 25 सप्टेंबर :  भारत हा लोकशाही देश आहे आणि संघराज्य रचनाही आपण स्वीकारलेली आहे. संपूर्ण भारतातून निवडलेले त्यांचे प्रतिनिधी भारताच्या संसदेत नागरिकांचे नेतृत्व करत असतात. राज्यात त्याच पद्धतीने मुख्यमंत्री नेतृत्व करतात.  यात देशाचं नेतृत्त्व म्हणून पंतप्रधानपद सर्वात महत्त्वाचं, हे माहीत असेल. पण या पदावरच्या व्यक्तीला सर्वाधिक पगार असं साधं गणित नाही, हे लक्षात ठेवा. साऱ्या देशाचा गाडा आपल्या मंत्र्यांबरोबर ते हाकत असताना त्यासाठी पंतप्रधानांना  किती मानधन किंवा वेतन मिळतं? मंत्र्यांनाही दरमहा पगार मिळतो. आपल्या देशात सर्वांत जास्त पगार राष्ट्रपतींना असतो, असा आपला गैरसमज असेल तर तो बदला. राज्याच्या मुख्यमंत्र्यांनादेखील पंतप्रधानांपेक्षा जास्त पगार मिळतो. खासगी क्षेत्रात पगार अधिक आपल्या देशात खासगी क्षेत्रामध्ये सर्वांत जास्त वेतन मिळतं. सरकारी नोकरदारांना आणि कर्मचाऱ्यांना वेतन कमी असतं. मात्र सुविधा मोठ्या प्रमाणात असल्याने ही रक्कमदेखील कमी नसते. सध्या भारतात CEO पदावर कार्यरत असणाऱ्या व्यक्तींना जास्त  वेतन असतं. यामध्ये टेक महिंद्रा कंपनीचे CEO सी. पी. गुरनानी यांना वार्षिक 165 कोटी रुपये पगार  मिळतो. मात्र भारताच्या पंतप्रधानांचा पगार ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल. भारत स्वतंत्र झाला त्या वेळी पंतप्रधानांचा पगार इतर मंत्र्यांइतकाच असायचा. मात्र हळूहळू कायद्यात बदल करून यामध्ये वाढ करण्यात आली. मोदींना किती मिळतं वेतन? सुरुवातीला पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी मंत्र्यांचा पगार दरमहा 3000 रुपये ठरवला होता. त्याचवेळी त्यांनी स्वतःलादेखील तितकाच पगार घेण्याचा निर्णय घेतला होता. सध्या भारताच्या पंतप्रधानांचा दरमहा पगार 1 लाख 60 हजार रुपये आहे. त्यांच्याहून देशातील काही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांचे पगार जास्त आहेत. अनेक राज्यांतील मुख्यमंत्री महिन्याला चार लाख रुपये पगार घेतात तर काही राज्यातील मुख्यमंत्री हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहून कमी वेतन स्वीकारतात. या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना आहे सर्वाधिक पगार सर्वाधिक पगार घेणाऱ्या मुख्यमंत्र्यांमध्ये तेलंगणचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव पहिल्या क्रमांकावर आहेत. त्यांना 4 लाख 10 हजार रुपये पगार मिळतो. तर सर्वांत कमी वेतन हे त्रिपुराचे  मुख्यमंत्री बिप्लव कुमार देव यांना मिळते. त्रिपुराच्या मुख्यमंत्र्यांना 1 लाख 5 हजार रुपये पगार मिळतो. तेलंगणानंतर  दिल्ली आणि गुजरातच्या मुख्यमंत्र्यांना सर्वांत जास्त वेतन मिळतं. येथील मुख्यमंत्र्यांना अनुक्रमे 3 लाख 90 हजार आणि 3 लाख 21 हजार रुपये पगार मिळतो. या तीन राज्यांव्यतिरिक्त उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश आणि हिमाचल प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांचा पगार हा 3 लाख रुपयांहून अधिक आहे. त्याचबरोबर अनेक राज्यांमध्ये मुख्यमंत्र्यांचा पगार हे राज्यपालांपेक्षा अधिक आहे.
    Published by:अरुंधती रानडे जोशी
    First published:

    Tags: Narendra modi, Uddhav thackeray

    पुढील बातम्या