Home /News /mumbai /

ठाकरे सरकार झाले अनाथांचे आधार, 306 मुलांच्या खात्यात 15 कोटी जमा!

ठाकरे सरकार झाले अनाथांचे आधार, 306 मुलांच्या खात्यात 15 कोटी जमा!

 दोन्ही पालक गमावलेल्या बालकांना मदत म्हणून प्रत्येकी 5 लाख रुपये देण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

दोन्ही पालक गमावलेल्या बालकांना मदत म्हणून प्रत्येकी 5 लाख रुपये देण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

दोन्ही पालक गमावलेल्या बालकांना मदत म्हणून प्रत्येकी 5 लाख रुपये देण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

     मुंबई, 03 ऑक्टोबर : कोरोनाची (corona) महामारी आज आटोक्यात आली आहे. पण, तिच्या जखमा अजूनही कायम आहे. कोरोनाची लागण झाल्यामुळे अनेक कुटुंब उद्ध्वस्त झाली आहे. घरातील कर्त्या पुरुषाचे निधन झाल्यामुळे अनेक मुलांवरील आई-वडिलांचे छत्र हरपले आहे. अशा या निराधार मुलांचे ठाकरे सरकार (mva government ) आधार झाले आहे. राज्यातील 306 मुलांच्या खात्यात प्रत्येकी पाच लाख रुपये जमा करण्यात आले आहे. कोरोना संकटाने राज्यातील अनेक बालकांचे छत्र हिरावून नेले. दोन्ही पालक गमावलेल्या बालकांना मदत म्हणून प्रत्येकी 5 लाख रुपये देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्याप्रमाणे अशा बालकांच्या खात्यात 5 लाख रुपये जमा केले असल्याची माहिती, राज्याच्या महिला व बालविकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर (yashomati thakur ) यांनी दिली आहे. कोरोना महामारीमुळे गेल्या दोन वर्षांच्या कालावधीत राज्यातील विविध जिल्ह्यातील शेकडो बालके आई वडिलांचे छत्र हरपल्याने अनाथ झाली आहेत. अशा बालकांच्या भविष्यासाठी, त्यांच्या शिक्षणासाठी, एकूणच त्यांच्या संरक्षणासाठी काही आर्थिक तरतूद करणे गरजेचे होते, यासाठी महिला बाल विकास विभागाच्यावतीने ॲड. यशोमती ठाकूर यांनी सातत्याने पाठपुरावा केला. Record: सप्टेंबरमध्ये UPI द्वारे झाले इतक्या लाख कोटी रुपयांचे 3.65 अब्ज व्यवहार या पाठपुराव्यानंतर कोविड महामारीत अनाथ झालेल्या बालकांच्या खात्यामध्ये प्रत्येकी 5 लाख रुपये जमा करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. या निर्णयानुसार नुकतेच राज्यातील 306 अनाथ बालकांच्या खात्यात सुमारे 15 कोटी 30 लाख रुपये जमा करण्यात आले आहेत. तसंच आतापर्यंत कोरोनामुळे अनाथ बालकांची राज्यातील एकूण संख्या सुमारे सहाशे इतकी असून उर्वरित बालकांच्या खात्यातही लवकरच पैसे जमा करण्यात येतील, अशी माहितीही ठाकूर यांनी दिली आहे. IPL 2021 : हा बॉल पाहून तुम्हीही म्हणाल, चहल T20 World Cup मध्ये का नाही? VIDEO राज्यातील गोंदिया, चंद्रपूर, सांगली, वर्धा, सोलापूर रायगड आलिबाग, रत्नागिरी, नाशिक, अमरावती आणि पुणे, नागपूर अशा विविध 24 जिल्ह्यांमधील बालकांच्या खात्यात पैसे वर्ग झाल्याचा तपशील विभागाकडे नुकताच प्राप्त झाला आहे. यामुळे या बालकांना काही प्रमाणामध्ये आर्थिक सुरक्षितता देता आली असून विविध योजनांच्या माध्यमातून या बालकांच्या शिक्षण आणि संगोपनासाठी प्रयत्न केले जातील असेही, ॲड. ठाकूर यांनी यावेळी सांगितलं.
    Published by:sachin Salve
    First published:

    पुढील बातम्या