Home /News /money /

Record Break : सप्टेंबरमध्ये UPI द्वारे झाले 6.5 लाख कोटी रुपयांचे 3.65 अब्जहून अधिक व्यवहार

Record Break : सप्टेंबरमध्ये UPI द्वारे झाले 6.5 लाख कोटी रुपयांचे 3.65 अब्जहून अधिक व्यवहार

पेमेंट प्लॅटफॉर्म UPI च्या माध्यमातून सप्टेंबरमध्ये 3.65 अब्ज व्यवहारांद्वारे 6.5 लाख कोटी रुपयांचे व्यवहार झालेत. संख्या आणि किंमती या दोन्ही बाबतीत ही UPI ची आतापर्यंतची सर्वोच्च पातळी आहे.

    नवी दिल्ली, 03 ऑक्टोबर : देशात डिजिटल पेमेंटचा (Digital Payment) झपाट्यानं विस्तार होत आहे. त्याच वेळी, भारतीय राष्ट्रीय पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) चा पेमेंट प्लॅटफॉर्म, युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस (UPI - Unified Payments Interface) द्वारे सप्टेंबरमध्ये 6.5 लाख कोटी रुपयांचे एकूण 3.65 अब्ज व्यवहार झालेत. विशेष बाब म्हणजे सलग तिसरा महिना आहे, जेव्हा यूपीआयच्या माध्यमातून 3 अब्जाहून अधिक व्यवहार झालेत. अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Economy Minister Nirmala Sitharaman) यांनी याविषयी ट्वीट केलंय. NPCI चा पेमेंट प्लॅटफॉर्म UPI च्या माध्यमातून सप्टेंबरमध्ये 3.65 अब्ज व्यवहारांद्वारे 6.5 लाख कोटी रुपयांचे व्यवहार झालेत. संख्या आणि किंमती या दोन्ही बाबतीत ही UPI ची आतापर्यंतची सर्वोच्च पातळी आहे. सलग तिसऱ्या महिन्यात यूपीआयवर तीन अब्जाहून अधिक व्यवहार झाले आहेत. कोरोना महामारीदरम्यान देशात डिजिटल पेमेंटचा व्यापक प्रमाणात अवलंब केल्याचं हे लक्षण आहे, असं त्यांनी म्हटलंय. हे वाचा - मुलीच्या इलाजासाठी अफगाणी महिलेवर मुलगा विकण्याची वेळ, किंमत ऐकून बसेल धक्का ऑगस्टच्या तुलनेत ऑनलाईन व्यवहारांचं प्रमाण 3 टक्क्यांनी वाढलंय. त्याचं मूल्य 2.35 टक्के जास्त आहे. मात्र, गेल्या वर्षीच्या तुलनेत हा व्यवहार मूल्य आणि प्रमाण या दोन्ही बाबतीत दुप्पट झाला आहे. ऑगस्टमध्ये 3.59 अब्ज व्यवहारांद्वारे 6.39 लाख कोटी रुपयांचे व्यवहार UPI द्वारे केले गेले होते. तर, जुलैमध्ये 3.24 अब्ज व्यवहारांद्वारे 6.06 लाख कोटी रुपयांचे व्यवहार झाले. हे वाचा - आला वारा गेला वारा, ताईचा pic म्हणजे corona मध्ये sanitizer चा फवारा ; प्रिया बापटच्या PHOTO वर चाहत्याची भन्नाट कमेंट UPI म्हणजे काय? UPI ही रिअल टाइम पेमेंट सिस्टीम आहे, जी मोबाईल अॅपद्वारे बँक खात्यात त्वरित पैसे हस्तांतरित करण्याची परवानगी देते. UPI द्वारे, तुम्ही एका बँक खात्याला अनेक UPI अॅप्ससह लिंक करू शकता. त्याच वेळी, एका UPI अॅपद्वारे अनेक बँक खाती चालवली जाऊ शकतात.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Online payments, Online shopping, Upi

    पुढील बातम्या