मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

IPL 2021 : हा बॉल पाहून तुम्हीही म्हणाल, चहल T20 World Cup मध्ये का नाही? VIDEO

IPL 2021 : हा बॉल पाहून तुम्हीही म्हणाल, चहल T20 World Cup मध्ये का नाही? VIDEO

फोटो सौजन्य : IPL/BCCI

फोटो सौजन्य : IPL/BCCI

टी-20 वर्ल्ड कपमध्ये (T20 World Cup) निवड न होणं युझवेंद्र चहलच्या (Yuzvendra Chahal) चांगलंच जिव्हारी लागलं आहे. आयपीएलच्या दुसऱ्या राऊंडमध्ये (IPL 2021) चहल जबरदस्त फॉर्ममध्ये आहे.

    शारजाह, 3 ऑक्टोबर : टी-20 वर्ल्ड कपमध्ये (T20 World Cup) निवड न होणं युझवेंद्र चहलच्या (Yuzvendra Chahal) चांगलंच जिव्हारी लागलं आहे. आयपीएलच्या दुसऱ्या राऊंडमध्ये (IPL 2021) चहल जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. पंजाब किंग्सविरुद्धच्या (RCB vs PBKS) सामन्यातही चहलने उत्कृष्ट कामगिरी केली, त्यामुळे आरसीबीने प्ले-ऑफमध्ये स्थान मिळवलं आहे. चहलने या सामन्यात 4 ओव्हरमध्ये 29 रन देऊन 3 विकेट घेतल्या. यामध्ये मयंक अग्रवाल, निकोलस पूरन आणि सरफराज खान (Sarfaraz Khan) यांचा समावेश होता. चहलने घेतलेली सरफराजच्या विकेटचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सरफराजची ही विकेट पाहून अनेकांनी हा बॉल ऑफ द आयपीएल असल्याची प्रतिक्रियाही दिली. 16 व्या ओव्हरच्या चौथ्या बॉलला चहलला विकेट मिळाली. त्याने टाकलेला हा बॉल लेग स्टम्पवर पडला आणि ऑफ स्टम्पच्या बेल्सला लागला. चहलने टाकलेला हा बॉल सरफराजला झेपलाच नाही आणि तो पहिल्याच बॉलला पॅव्हेलियनमध्ये परतला. आयपीएल 2021 च्या या मोसमात युझवेंद्र चहलने 12 मॅचमध्ये 7.24 चा इकोनॉमी रेट आणि 21.21 च्या सरासरीने 14 विकेट घेतल्या आहेत. टी-20 वर्ल्ड कपसाठी भारतीय टीममध्ये युझवेंद्र चहलऐवजी राहुल चहरला (Rahul Chahar) संधी देण्यात आली, पण आयपीएलच्या दुसऱ्या राऊंडमध्ये चहरची कामगिरी निराशाजनक झाली आहे. शनिवारी दिल्लीविरुद्ध झालेल्या सामन्यात तर राहुल चहरला मुंबई इंडियन्सने (Mumbai Indians) बाहेर बसवलं होतं. चहरने या मोसमात 11 सामन्यांमध्ये 7.39 च्या इकोनॉमी रेटने आणि 24.46 च्या सरासरीने 13 विकेट घेतल्या आहेत. यातल्या राहुल चहरच्या बहुतेक विकेट या एप्रिल-मे महिन्यात भारतात झालेल्या आयपीएलच्या पहिल्या राऊंडवेळच्या आहेत. युझवेंद्र चहलच्या या कामगिरीमुळे आरसीबीने पंजाबचा पराभव केला, सोबतच प्ले-ऑफमध्येही प्रवेश मिळवला आहे. बँगलोरचा पुढचा सामना आता 6 ऑक्टोबरला हैदराबादविरुद्ध आहे. टी-20 वर्ल्ड कपसाठीच्या टीममध्ये बदल करायचा असेल तर टीम इंडियाला 10 ऑक्टोबरपर्यंतचा वेळ आहे.
    Published by:Shreyas
    First published:

    Tags: IPL 2021, RCB, Yuzvendra Chahal

    पुढील बातम्या