मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

राज्यासाठी आनंदाची बातमी, remdesivir चा पुरवठा वाढला, मुख्यमंत्र्यांनी मानले मोदींचे आभार

राज्यासाठी आनंदाची बातमी, remdesivir चा पुरवठा वाढला, मुख्यमंत्र्यांनी मानले मोदींचे आभार

 हा पुरवठा पूर्वी 2 लाख 69 हजार व्हायल्स एवढा होता, तो आता वाढवून 4 लाख 35 हजार करण्यात आला आहे.

हा पुरवठा पूर्वी 2 लाख 69 हजार व्हायल्स एवढा होता, तो आता वाढवून 4 लाख 35 हजार करण्यात आला आहे.

हा पुरवठा पूर्वी 2 लाख 69 हजार व्हायल्स एवढा होता, तो आता वाढवून 4 लाख 35 हजार करण्यात आला आहे.

  • Published by:  sachin Salve

मुंबई, 24 एप्रिल : राज्याला कोरोनाचा (Corona) विळखा पडला आहे. कोरोना रुग्णांवर उपचारासाठी रेमडेसीवीर इंजेक्शनचा (remdesivir injection) तुटवडा निर्माण झाल्यामुळे नातेवाईकांना वणवण भटकावे लागले. पण, अखेर आता राज्यात मोठ्या प्रमाणात रेमडेसीवीर इंजेक्शनचा साठा उपलब्ध झाला आहे, अशी माहिती खुद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Cm Uddhav Thackery) यांनी दिली आहे. याबद्दल त्यांनी पंतप्रधान मोदींचे (Pm Narendra Modi) आभार मानले आहे.

रेमडीसीवीर इंजेक्शनच्या तुटवड्यामुळे निर्माण झालेल्या समस्येकडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकारकडे पत्र व्यवहार केला होता. तसंच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देखील पत्राद्वारे विनंती केली होती. आज केंद्राने राज्यासाठी 30 एप्रिलपर्यंत 4 लाख 35 हजार व्हायल्सचा पुरवठा देण्याचे आदेश काढले. मुख्यमंत्र्यांनी याकरिता पंतप्रधानांचे आभार मानले आहेत. हा पुरवठा पूर्वी 2 लाख 69 हजार व्हायल्स एवढा होता, तो आता वाढवून 4 लाख 35 हजार करण्यात आला आहे.

कोरोनामुळे सुट्टी रद्द; पोलीस स्टेशनमध्येच महिला हवालदाराच्या हळदीचा कार्यक्रम

आज केंद्रीय आरोग्य खात्याच्या औषधी विभागाचे सहसचिव नवदीप रिनवा यांचे यासंदर्भातील पत्र प्राप्त झाले आहे. यात म्हटले आहे की , 21 एप्रिल ते 31 एप्रिलपर्यंतचा हा पुरवठा असणार आहे. देशभरातील राज्यांच्या मागणीप्रमाणे 16 लाख रेमडेसीवीर व्हायल्स केंद्र पुरविणार असून सात परवानाधारक उत्पादक कंपन्यांना प्राधान्याने हा पुरवठा करण्यास सांगण्यात आले आहे.

राज्यात 67,160  नवीन रुग्णांचे निदान

राज्य सरकारकडून गेल्या 24 तासांतील कोरोनाबाधित रुग्णांची आकडेवारी जाहीर करण्यात आली आहे.  आज राज्यात 67,160  नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. तर आज 676 कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर 1.51 टकके एवढा आहे.

सॅल्यूट! चार महिन्यांची गर्भवती नर्स रोजे ठेवून कोविड रुग्णांची करतेय सेवा

तर दुसरीकडे 63818 रुग्ण बरे झाले असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्यात आजपर्यंत एकूण 34,68,610 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 82.02 एवढे झाले आहे.

सध्या राज्यात 41,87,675 व्यक्ती होमक्वारंटाइनमध्ये आहेत तर 29,246 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत. तर आज एकूण 6,94,480  ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.

First published: