Home /News /national /

सॅल्यूट! चार महिन्यांची गर्भवती नर्स रमजानचे रोजे ठेवून कोविड रुग्णांची करतेय सेवा

सॅल्यूट! चार महिन्यांची गर्भवती नर्स रमजानचे रोजे ठेवून कोविड रुग्णांची करतेय सेवा

अनेक ठिकाणी माणुसकीला काळिमा फासणाऱ्या घटना पाहायला मिळत आहेत; पण असं असलं तरीही माणुसकी संपलेली नाही, याचं दर्शन घडवणारी ही घटना आहे.

    सुरत, 24 एप्रिल : कोरोनाच्या फैलावामुळे देशभर सर्वत्र भयावह वातावरण आहे. दुर्दैवाचे दशावतार अनेककुटुंबांना पाहावे लागत आहेत. त्यातच अनेक ठिकाणी माणुसकीला काळिमा फासणाऱ्या घटना पाहायला मिळत आहेत; पण असं असलं तरीही माणुसकी संपलेली नाही, याचं दर्शन घडवणाऱ्या घटनाही दिसत आहेत. त्यामुळे जगण्याची नवी उमेद लोकांना मिळत आहे. अशीच एक गोष्ट गुजरातमध्ये (Gujarat)सध्या लोकांना अनुभवायला मिळत आहे. चार महिन्यांची गर्भवती असलेली एक नर्स कोरोनाग्रस्तांची देखभाल करून मानवतेचा धर्म निभावत आहे. एवढंच नव्हे,तर सध्या सुरू असलेल्या मुस्लिमांच्या पवित्र रमजान महिन्यानिमित्त दिवसभर रोजा ठेवून ती आपल्या धर्माचंही पालन करत आहे.'एनडीटीव्ही'ने याबद्दलचं वृत्त दिलं आहे. या नर्सचं नाव नॅन्सी आयजा मिस्त्री (Nancy Ayeza Mistry)असं आहे. ती चार महिन्यांची गर्भवती असून, तरीही ती सुरतच्या (Surat)कोविड केअर सेंटरमध्ये नियमितपणे आपली ड्युटी पार पाडत आहे. रमजान महिन्यानिमित्त ती रोजे ठेवून आपल्या धर्माचं पालनही करते आहे. त्याबद्दलती म्हणते, 'मी नर्स म्हणून माझं कर्तव्य करत आहे. माझ्यासाठी लोकांची सेवाहीच पूजा, उपासना आहे.'  'द लल्लनटॉप'या वेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार, सुरतच्या अलथान भागात असलेल्या सुरत महानगरपालिकेच्या कम्युनिटी हॉलमध्ये सुरू असलेल्या कोविड केअर सेंटरमध्ये (Covid Care Center)ही नर्स काम करते. हे ही वाचा-कोरोना लशीचे दोन्ही डोस घ्यायलाच हवेत का? पाहा काय म्हणाले AIIMS चे डॉक्टर सध्या त्या सेंटरमध्ये सुमारे 100 कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तिथल्या रुग्णांची संख्या एवढी आहे, की 24 तास डॉक्टर्स आणि नर्सेसना तिथे काम करावं लागतं आहे. त्यापैकी एक नर्स म्हणजे नॅन्सी आयजा मिस्त्री.  29 वर्षांची नॅन्सी हे कोविड सेंटर सुरू झाल्यापासून तिथे काम करते. सध्या ती चार महिन्यांची गर्भवती असली, तरी न घाबरता आपलं कर्तव्य पार पाडते आहे. रोजेही ठेवते आहे. रमजानच्या पवित्र महिन्यात सेवा केल्यामुळे अल्ला नेकी प्रदान करील, असं तीम्हणते. 'आज-तक'शी बोलताना ती म्हणाली, 'मी सध्या अटल संवेदना कोविड सेंटरमध्ये काम करते. माझ्या गर्भारपणाचा चौथा महिना सुरू आहे. त्यामुळे मी पोटातल्या बाळाची काळजी तर घेतेच; पण रोजे ठेवून रुग्ण सेवाही सुरू आहे. रमजानच्या महिन्यात रुग्णांचे आशीर्वाद मिळाले तर चांगलीच गोष्ट आहे.'  यामुळे नॅन्सीची प्रतिकारशक्ती घटण्याचा आणि तिला संसर्ग होण्याचाही धोका आहे. तरीही ती कार्यरत आहे. प्रेन्सन्सी मुळे पीपीई किट घालून काम करणं तिला अडचणीचं ठरतं. म्हणून ती गाउन घालून काम करते,असं तिची सहकारी नर्स ग्रीश्मा सोलंकी यांनी सांगितलं.
    First published:

    Tags: Corona, Corona patient

    पुढील बातम्या