Home /News /national /

कोरोनामुळे सुट्टी रद्द; पोलीस स्टेशनमध्येच रंगला महिला हवालदाराच्या हळदीचा कार्यक्रम

कोरोनामुळे सुट्टी रद्द; पोलीस स्टेशनमध्येच रंगला महिला हवालदाराच्या हळदीचा कार्यक्रम

पोलीस स्टेशनच्या आवारातच या पोलीस स्टेशनमध्ये तैनात असलेल्या तिच्या सहकारी महिला हवालदार आणि अन्य पोलिस कर्मचारी यांनी पारंपरिक गाणी म्हणत आणि विधीसह हा हळदीचा कार्यक्रम पार पाडला.

    राजस्थान, 24 एप्रिल : कोविड-19 चे (Covid-19) सुरक्षा नियम पाळण्याबाबत दुर्लक्ष करणाऱ्या लोकांमुळे दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढत असून या दुसऱ्या लाटेत तर रुग्णसंख्या दररोज नवा उच्चांक नोंदवत आहे. या परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी आरोग्य कर्मचारी अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी, आघाडीवरील कर्मचारी, कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी काम करणारे पोलीस आणि इतर कर्मचारी असे सगळेच लोक दिवसरात्र राबत आहेत. कामाचा ताण प्रचंड वाढला आहे, तरीही हे कर्मचारी स्वतःचा वैयक्तिक वेळ, ऊर्जा आणि प्रसंगी पैसे खर्च करून लोकांना सेवा देत आहेत. स्वतःसाठी त्यांनी सुट्टी देखील मिळत नाही. याचेच एक उदाहरण आहे राजस्थानमधील एक महिला पोलीस हवालदार (Lady Constable). एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार, डुंगरपूर पोलीस स्टेशनमध्ये (Dungarpur Police Station) सेवेत असलेल्या या महिला हवालदाराला कोरोना साथीमुळे स्वतःच्या हळदीच्या कार्यक्रमासाठीदेखील (Haldi Ceremony) सुट्टी मिळाली नाही, त्यामुळं अखेर पोलीस स्टेशनमध्येच तिचा हळदी सोहळा साजरा करण्यात आला. पोलीस स्टेशनच्या आवारातच या पोलीस स्टेशनमध्ये तैनात असलेल्या तिच्या सहकारी महिला हवालदार आणि अन्य पोलिस कर्मचारी यांनी पारंपरिक गाणी म्हणत आणि विधीसह हा हळदीचा कार्यक्रम पार पाडला. या वेळी तिच्या कुटुंबातील काही मोजकेच सदस्य उपस्थित होते. या कार्यक्रमाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यामध्ये पिवळ्या रंगाच्या सलवार सूट आणि लाल दुपट्टा परिधान केलेली ही महिला हवालदार खुर्चीवर बसली असून, गणवेश आणि मास्क घातलेल्या सहकारी कर्मचारी पारंपरिक राजस्थानी गाणी गात तिला हळद लावताना दिसत आहेत. हे ही वाचा-रिक्षावाल्याचा मोठेपणा, कोरोनाबाधित रुग्णांसाठी सुरू केली फ्री ऑटो सर्विस! दरम्यान, राजस्थानमध्ये कोरोना रुग्णाच्या संख्येत मोठी वाढ झाल्यानं तिथं सोमवारपासून 3 मेपर्यंत 15 दिवसांच्या लॉकडाउनची (Lockdown) घोषणा करण्यात आली असून, अनेक नवीन निर्बंध घालण्यात आले आहेत. राजस्थानमध्ये रविवारी तब्बल 10 हजार 514 नवीन रुग्णांची नोंद झाली, तर 42 रुग्णांचा मृत्यू झाला. कोरोनाची साथ पसरल्यापासून आतापर्यंत नोंदवली गेलेली ही राज्यातील सर्वाधिक रुग्णसंख्या आहे. राजस्थानमध्ये आतापर्यंत 4 लाख 14 हजार 869 लोकांना कोरोनाचा संसर्ग झाला असून, आतापर्यंत 3 हजार 151 जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यात 67 हजार 387 रुग्ण उपचार घेत आहेत. रविवारी झालेल्या 42 मृत्यूंपैकी कोटामध्ये 13, जोधपूरमध्ये सात, जयपूर आणि उदयपुरमध्ये प्रत्येकी चार, बिकानेरमध्ये तीन, अलवर आणि चुरू येथे प्रत्येकी एक, भरतपूर, दौसा, डूंगरपूर, गंगानगर, नागौर, राजसमंद आणि सीकर इथं प्रत्येकी एक मृत्यू झाला आहे.
    First published:

    Tags: Corona virus in india, Marriage

    पुढील बातम्या