मुंबई, 06 एप्रिल : राज्यात कोरोनाबाधित ( corona ) रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे तर दुसरीकडे लसीकरणही ( corona vaccine) सुरू आहे. पण, राज्यात आता फक्त 3 दिवस पुरेल इतकाच लशीचा साठा आहे, अशी माहिती राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी दिली आहे. केंद्र सरकारने तातडीने लशीचा साठा उपलब्ध करावा, अशी मागणी केली आहे.
न्यूज18 लोकमतशी बोलत असताना राजेश टोपे यांनी राज्यातील लसीकरणाची माहिती दिली. राज्यात लसीकरण मोहीम पूर्ण क्षमतेनं सुरू आहे. पण आता राज्यात 3 दिवस पुरेल इतकाच लसीकरणासाठी लस उपलब्ध आहे. त्यामुळे केंद्र सरकारने तात्काळ उपलब्ध करावी, जेणे करून लस देण्याच्या मोहिमेत खंड पडणार नाही, अशी माहिती राजेश टोपे यांनी दिली.
News18 Lokmat Impact: रेमडिसिवीर इंजेक्शनच्या किमती कमी होणार
कोरोनाबाधित रुग्णांसाठी आवश्यक असलेल्या रेमडेसिवीर हे इंजेक्शन (Remdesivir injection) अव्वाच्या सव्वा दरात विक्री होत आहे. विनाकारण काही हॉस्पिटल याचा वापर करतात. काही ठिकाणी ठरलेल्या किंमतीपेक्षा दर जास्त लावले जात असल्याचे आढळून आले आहे, त्यामुळे अशा हॉस्पिटलवर कारवाई केली जाईल, असा इशाराही राजेश टोपेंनी दिला.
UPI Transaction फेल झाल्यास इथं तक्रार करा; बँकेकडून मिळेल भरपाई
उद्या सर्व जिल्हा रूग्णालय उपसंचालक यांची बैठक बोलावण्यात आली आहे. यात आढावा घेतला जाणार आहे.
रेमडेसिवीर इंजेक्शन यावर सुधाकर शिंदे यांची समिती गठीत केली आहे. ती दोन दिवसात रिपोर्ट सादर करेल, 1400 रूपये आसपासपर्यंत दर रेमडेसिवीर उपलब्ध केले जातील, अशी माहिती राजेश टोपे यांनी दिली.
दर कमी करण्याचं मंत्री राजेंद्र शिंगणे यांचं आश्वासन
रेमडिसिवीर औषधाची एमआरपी कमी करण्यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करण्यात येत आहे. औषधाची एमआरपी कमी करण्याचा अधिकार केंद्र शासनाला आहे. त्याप्रमाणे एमआरपी कमी करण्याचा प्रस्ताव केंद्राकडे पाठवण्यात आला आहे अशी माहिती अन्न आणि औषध प्रशासन मंत्री राजेंद्र शिंगणे यांनी दिली आहे.
नागरिकांना मोठा दिलासा
कोरोना बाधित रुग्णांचे आधीच प्रचंड हाल होत आहेत त्यातच इंजेक्शनचे दर प्रचंड असल्याने नागरिकांना मोठा आर्थिक फटका सहन करावा लागत होता. मात्र, आमच्या बातमीनंतर रेमडिसिवीर इंजेक्शनचे दर आता कमी होणार आहेत त्यामुळे. सर्वसामान्यांचा आवाज म्हणजे न्यूज 18 लोकमत यावर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब झाला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Coronavirus