मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /रेमडिसिवीर इंजेक्शनच्या किमतींमध्ये एवढी तफावत का? News18Lokmat च्या बातमीनंतर सरकारचं Covid औषधाबद्दल आश्वासन

रेमडिसिवीर इंजेक्शनच्या किमतींमध्ये एवढी तफावत का? News18Lokmat च्या बातमीनंतर सरकारचं Covid औषधाबद्दल आश्वासन

Remdesivir injection price: रेमडिसिवीर इंजेक्शनच्या किमती कमी करण्यात येणार असं आश्वासन राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री राजेंद्र शिंगणे यांनी दिलं आहे.

Remdesivir injection price: रेमडिसिवीर इंजेक्शनच्या किमती कमी करण्यात येणार असं आश्वासन राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री राजेंद्र शिंगणे यांनी दिलं आहे.

Remdesivir injection price: रेमडिसिवीर इंजेक्शनच्या किमती कमी करण्यात येणार असं आश्वासन राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री राजेंद्र शिंगणे यांनी दिलं आहे.

मुंबई, 6 एप्रिल : मुंबईसह महाराष्ट्रात कोरोना (Corona in Maharashtra) बाधितांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. याचवेळी कोरोना बाधित रुग्णांसाठी आवश्यक असलेल्या रेमडेसिवीर हे इंजेक्शन (Remdesivir injection) अव्वाच्या सव्वा दरात विक्री होत आहे. प्रत्येक कंपनी वेगवेगळ्या किमतीत इंजेक्शन विक्री करत असल्याचं समोर आलं आहे. या रेमडिसिवीर इंजेक्शनच्या तफावतीचं वास्तव न्यूज 18 लोकमतने सर्वांसमोर मांडलं. त्यानंतर राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री राजेंद्र शिंगणे (Food and Drug Administration Minister Dr. Rajendra Shingane) यांनी या संदर्भात प्रतिक्रिया देत रेमडिसिवीर इंजेक्शनच्या किमती कमी करण्याचं आश्वासन (Remdesivir injection price will reduce) दिलं आहे.

कुठल्या कंपनीचं इंजेक्शन किती रुपयांत?

किमतीवर नियंत्रण का नाही?

मुद्दा हा आहे की, जर एका कंपनीला 899 रुपयांत रेमडिसिवीर इंजेक्शन विक्री करणं परवडत आहे. तर मग इतर कंपन्या अव्वाच्या सव्वा दराने इंजेक्शन का विक्री करत आहे. तसेच राज्य सरकारचं यावर नियंत्रण आहे की नाही हा सुद्धा प्रश्न उपस्थित होत आहे.

" isDesktop="true" id="537786" >

अन्न आणि औषध प्रशासनाचे आयुक्त अभिमन्यू काळे (FDA Commissioner Abhimanyu Kale) यांना या संदर्भात विचारले असता त्यांनी म्हटलं, "या किमती संपूर्ण देशभरात आहेत केवळ महाराष्ट्रात नाहीत. महाराष्ट्र शासनाने या किमती नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. आम्ही सर्व अधिकाऱ्यांनी मिळून या किमती कमी करण्यासाठी बैठक घेतली. किमती नियंत्रणात आणण्यासाठी आम्ही सर्व कंपन्यांसोबत बैठक घेतली आणि झायडस कॅडिला कंपनीने एमआरपी कमी करुन 899 रुपये इतकी केली. इतर कंपन्यांनी दर कमी करावे यासाठी DGCA म्हणजेच ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया यांच्या संपर्कात आहेत."

दर कमी करण्याचं मंत्री राजेंद्र शिंगणे यांचं आश्वासन

कोरोना बाधित रुग्णांसाठी उपयोगी असलेल्या रेमडिसिवीर इंजेक्शनचा पुरवठा पर्याप्त व्हावा, कृत्रिम तुटवडा निर्माण होऊ नये याची खबरदारी घेण्यात येत आहे. रेमडिसिवीर इंजेक्शनच्या भरमसाठ किमतीची बातमी न्यूज 18 लोकमतने लावून धरल्यानंतर अन्न आणि औषध प्रशासन मंत्री राजेंद्र शिंगणे यांनी त्याची तातडीने दखल घेतली. अन्न आणि औषध प्रशासन मंत्री राजेंद्र शिंगणे यांनी सांगितलं, "कोविडच्या वाढत्या संसर्गात रेमडिसिवीर संदर्भात परवा बैठक घेतली. काही कंपन्यांचे दर 800 रुपयांच्या घरात आहेत तर काही कंपन्यांचे दर जास्त आहेत. येत्या दोन तीन दिवसांत म्हणजे गुरुवार किंवा शुक्रवारपर्यंत सर्व रेमडिसिवीरच्या किमती 1300 रुपयांपर्यंत आम्ही करु. रेमडिसीवर बनविणाऱ्या सर्व कंपन्यांच्या किमती या समान असाव्या यासाठी आमचा प्रयत्न असणार आहे."

" isDesktop="true" id="537786" >

रेमडिसिवीर औषधाची एमआरपी कमी करण्यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करण्यात येत आहे. औषधाची एमआरपी कमी करण्याचा अधिकार केंद्र शासनाला आहे. त्याप्रमाणे एमआरपी कमी करण्याचा प्रस्ताव केंद्राकडे पाठवण्यात आला आहे अशी माहिती अन्न आणि औषध प्रशासन मंत्री राजेंद्र शिंगणे यांनी दिली आहे.

नागरिकांना मोठा दिलासा

कोरोना बाधित रुग्णांचे आधीच प्रचंड हाल होत आहेत त्यातच इंजेक्शनचे दर प्रचंड असल्याने नागरिकांना मोठा आर्थिक फटका सहन करावा लागत होता. मात्र, आमच्या बातमीनंतर रेमडिसिवीर इंजेक्शनचे दर आता कमी होणार आहेत त्यामुळे. सर्वसामान्यांचा आवाज म्हणजे न्यूज 18 लोकमत यावर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब झाला आहे.

First published:
top videos

    Tags: Coronavirus, Covid-19