मराठी बातम्या /बातम्या /मनी /UPI Transaction फेल झाल्यास इथं तक्रार करा; बँकेकडून मिळेल भरपाई

UPI Transaction फेल झाल्यास इथं तक्रार करा; बँकेकडून मिळेल भरपाई

UPI Transaction फेल झाल्यानंतर ठराविक मुदतीत पैसे परत तुमच्या बँक खात्यात आले नाहीत, तर काय करायला हवं ते पाहा.

UPI Transaction फेल झाल्यानंतर ठराविक मुदतीत पैसे परत तुमच्या बँक खात्यात आले नाहीत, तर काय करायला हवं ते पाहा.

UPI Transaction फेल झाल्यानंतर ठराविक मुदतीत पैसे परत तुमच्या बँक खात्यात आले नाहीत, तर काय करायला हवं ते पाहा.

  नवी दिल्ली, 06 एप्रिल : यूपीआय (UPI) अर्थात युनिफाइड पेमेंट इंटरफेस हा आता लोकांच्या रोजच्या वापराचा विषय झाला आहे. आधी नोटबंदी आणि नंतर लॉकडाउन (Lockdown) यामुळे ऑनलाइन पैसे ट्रान्स्फर (Online Money Transfer) करण्याचं प्रमाण वाढलं. त्यात यूपीआयच्या वापराचं प्रमाण लक्षणीय आहे. ते सोयीस्कर असलं तरी त्यात अनेक अडचणींशी सामना करावा लागतो. काही वेळा पैसे आपल्या खात्यातून कापले जातात, पण समोरच्या खात्यात जमाच होत नाहीत. अशा अयशस्वी झालेल्या व्यवहारांमधले पैसे मूळ खात्यात परत येतात. पण ते निर्धारित वेळेत परत आले नाहीत, तर ग्राहकाला बँकेकडून भरपाई मिळते.

  भारतीय रिझर्व्ह बँकेने (Reserve Bank of India) अयशस्वी व्यवहार अर्थात Failed Transactions साठी सप्टेंबर 2019 मध्ये एक सर्क्युलर काढलं होतं. त्यानुसार अशा फेल ट्रान्झॅक्शन्समधील रक्कम ठराविक वेळेत परत येण्याचा कालावधी निश्चित करण्यात आला आहे. या कालावधीत पैसे परत न आल्यास बँकेला ग्राहकांना दररोज 100 रुपयांची नुकसान भरपाई देणं बंधनकारक आहे.

  यूपीआयद्वारे करण्यात आलेला व्यवहार अयशस्वी झाल्यास पैसे मूळ खात्यामध्ये दोन दिवसांत, म्हणजेच व्यवहार झालेला दिवस आणि पुढचा एक दिवस (T+1), एवढ्या कालावधीत परत यायला हवेत. एवढ्या कालावधीत पैसे परत न आल्यास बँकेकडून ग्राहकाला दिवसाला 100 रुपये नुकसान भरपाई द्यावी लागते.

  हे वाचा - 7 एप्रिलपर्यंत SBI देत आहे बंपर सूट, Shopping वर मिळेल 50 टक्के सवलत आणि कॅशबॅक  )

  यूपीआय व्यवहार केल्यानंतर तो अयशस्वी झाला आणि पैसेही दिलेल्या मुदतीत परत आले नाहीत, तर संबंधित बँकेच्या सर्व्हिस प्रोव्हायडर (Service Provider) तुम्ही तक्रार करू शकतो. Raise Dispute या पर्यायावर क्लिक करून तुम्ही तुमची तक्रार दाखल करू शकता. तुमची तक्रार योग्य आहे, याची खात्री केल्यानंतर तुमचे पैसे परत येतील. तक्रार करूनही बँकेकडून कोणत्याही प्रकारचा प्रतिसाद मिळाला नाही किंवा सहकार्य मिळालं नाही, तर तुम्ही आरबीआयच्या डिजिटल ट्रान्झॅक्शन (Digital Transaction) 2019 च्या ओम्बड्समन योजनेअंतर्गत बँकिंग ओम्बड्समनकडे (Banking Ombudsman) तक्रार करू शकता.

  First published:
  top videos

   Tags: Bank, Money, Online payments, Upi