मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /शिंदे गटाने टाकला मोठा डाव, निवडणूक आयोगाकडे दिले पत्र, आता शिवसेनाच करणार काबीज?

शिंदे गटाने टाकला मोठा डाव, निवडणूक आयोगाकडे दिले पत्र, आता शिवसेनाच करणार काबीज?

 शिंदे गटाने आता पक्ष ताब्यात घेण्याची शेवटची लढाई सुरू केली

शिंदे गटाने आता पक्ष ताब्यात घेण्याची शेवटची लढाई सुरू केली

शिंदे गटाने आता पक्ष ताब्यात घेण्याची शेवटची लढाई सुरू केली

मुंबई, 20 जुलै : शिवसेनेचे  (shivsena) आमदार आणि खासदार फोडून एकनाथ शिंदे (cm eknath shinde) यांनी वेगळा गट स्थापन केला आहे. पण, शिवसेना कुणाची हा प्रश्न उपस्थितीत झाला असून आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. मात्र, सुनावणीच्या आधीच शिंदे गटाने निवडणूक आयोगाकडे धाव घेतली आहे. एकनाथ शिंदे यांच्यासह पत्र आयोगाला देण्यात आले आहे. त्यामुळे शिवसेनाच काबीज करण्याचा प्रयत्न आता शिंदे गटाकडून होणार आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेचे आमदार आणि खासदार फोडून वेगळा गट स्थापन करून शिवसेनेला मोठा धक्का दिला. या प्रकरणाची आज सुप्रीम कोर्टात खंडपीठापुढे सुनावणी होणार आहे. मात्र,सुप्रीम कोर्टाच्या सुनावणीआधी शिंदे यांच्या गटाची निवडणूक आयोगात धाव घेतली आहे. एकनाथ शिंदेंच्या स्वाक्षरीने निवडणूक आयोगाला पत्र देण्यात आलं आहे. उद्धव ठाकरेंनी नियुक्त केलेली कार्यकारिणी बरखास्त करून नवीन कार्यकारिणी निवडल्याची माहितीच आयोगाला देण्यात आली आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाने जर मान्यता दिली तर शिवसेनाही शिंदेंच्या ताब्यात जाण्याची शक्यता आहे. शिंदे गटाने आता पक्ष ताब्यात घेण्याची शेवटची लढाई सुरू केली आहे.

('कुणीतरी बॅगेत 50-60 रुपये टाकायची', वाचा कुशल बद्रिकेची इमोशनल लव्हस्टोरी)

दरम्यान, एकनाथ शिंदे यांनी मिशन दिल्ली यशस्वी केले आहे. शिवसेनेचे हे 12 खासदार लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना जाऊन भेटले आणि पत्र दिलं. या पत्रात राहुल शेवाळे यांची लोकसभेत गटनेता म्हणून तर भावना गवळी यांची मुख्य प्रतोद म्हणून निवड व्हावी, अशी मागणी केली होती. ही मागणी आता लोकसभा अध्यक्षांनी मान्य केली आहे. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी शेवाळे यांना गटनेतेपदी तर भावना गवळी यांना प्रतोदपदी मान्यता दिल्यामुळे शिवसेनेचे उरलेले 6 खासदार अडचणीत आले आहेत. शिवसेनेच्या या 6 खासदारांना लोकसभेत भावना गवळी यांचा व्हिप मान्य करावा लागेल. या 6 खासदारांनी व्हिप मान्य केला नाही तर त्यांच्यावर कारवाईदेखील होऊ शकते.

(VIDEO: मुरली विजयला प्रेक्षकांनी DK, DK म्हणत चिडवलं, पाहा प्रतिक्रिया)

12 जानेवारी 1988 चा सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आणि जून 2019 मध्ये लोक जनशक्ती पक्षाच्या गटनेतेपदाबद्दलचा लोकसभा अध्यक्षांचा निर्णय योग्य धरण्याचा आणि सर्वोच्च न्यायालयाचा निकाल या आधारे लोकसभेत शिवसेना गटनेतेपदी राहुल शेवाळे यांच्या नियुक्तीला लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी मान्यता दिली आहे. आता लोकसभेत शिंदे गट वेगळा स्थापन झाला आहे. त्यामुळे शिवसेनेला हा मोठा धक्का मानला जात आहे.

6 खासदार कोण?

विनायक राऊत, अरविंद सावंत, गजानन किर्तीकर, ओमराजे निंबाळकर, संजय जाधव, राजन विचारे आणि कलाबेन डेलकर यांनी शिंदे गटाला पाठिंबा दिला नाही. याआधी शिवसेनेने भावना गवळी यांची प्रतोदपदावरून हकालपट्टी केली होती, तसं पत्र संजय राऊत यांनी लोकसभा अध्यक्षांना दिलं. राजन विचारे यांची मुख्य प्रतोदपदी तर विनायक राऊत यांची गटनेतेपदी निवड करण्यात आली, पण आता लोकसभा अध्यक्षांनी शेवाळेंना गटनेते आणि भावना गवळींना पुन्हा प्रतोद म्हणून मान्यता दिली आहे

First published:
top videos