मुंबई, 20 जुलै : टीम इंडियाचा माजी क्रिकेटपटू मुरली विजयनं (Murali Vijay) बऱ्याच काळानंतर क्रिकेटच्या मैदानावर पुनरागमन केलं आहे. सध्या तो तामिळनाडू प्रीमियर लीग (TNPL) मध्ये खेळत आहे. विजय आयपीएल 2020 नंतर पहिल्यांदाच खेळत असल्यानं सर्वांचं लक्ष त्याच्यावर आहे. या स्पर्धेत त्यानं एक दमदार शतक झळकावत आपण अजून संपलो नसल्याचंही दाखवून दिलंय. त्याचवेळी विजयचा एक व्हिडीओ समोर आलाय. या व्हिडीओमध्ये प्रेक्षक त्याला दिनेश कार्तिकच्या (Dinesh Karthik) नावावर चिडवत आहेत. काय आहे व्हिडीओ? व्हायरल झालेल्या या व्हिडीओमध्ये विजय बांऊड्री लाईनवर फिल्डिंग करताना दिसतोय. त्याला पाहाताच काही प्रेक्षक DK DK असं म्हणत त्याला चिडवत आहेत. प्रेक्षकांच्या या हुल्लडबाजीवर विजयनंही प्रतिक्रिया दिलीय. विजयनं या प्रेक्षकांकडे पाहिलं आणि त्यानं अजिबात न चिडता सौम्य हसत हात जोडले. यावेळी काही प्रेक्षकांनी विजयला पाठिंबा दिला.
#TNPL2022 DK DK DK ......
— Muthu (@muthu_offl) July 7, 2022
Murali Vijay reaction pic.twitter.com/wK8ZJ84351
काय आहे कार्तिकशी कनेक्शन? मुरली विजय आणि दिनेश कार्तिक हे तामिळनाडू आणि टीम इंडियातील सहकारी आहेत. पण, कार्तिकच्या कार्तिकची पहिली बायको निकिताबरोबर विजयचं प्रेम जुळलं. कार्तिक आणि निकिता यांचं 2007 साली लग्न झालं होतं. 2012 साली आयपीएल स्पर्धेच्या दरम्यान विजय आणि निकिता यांची भेट झाली. त्यानंतर हळूहळू दोघं एकमेकांच्या प्रेमात पडले. कार्तिकला त्यांच्या प्रेमाबद्दल कळल्यानंतर त्याने निकिताशी घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला.
कार्तिक आणि निकिता यांचा घटस्फोट झाला तेव्ही ती गर्भवती होती. कार्तिकशी घटस्फोट झाल्यानंतर निकिता आणि विजय यांनी लग्न केलं. निकिताला नंतर मुलगा झाला. कार्तिकनं कधीही त्या मुलावर हक्क सांगण्याचा प्रयत्न केला नाही. कार्तिकच्या आयुष्यात त्यानंतर आंतरराष्ट्रीय स्कॉश खेळाडू दीपिका पल्लिकलची एन्ट्री झाली. कार्तिक आणि दीपिका यांचं 2015 साली लग्न झालं. त्यांना जुळी मुलं आहेत. Ben Stokes Retirement : शेवटच्या वनडेमध्ये बेन स्टोक्सला अश्रू अनावर, मैदानातला इमोशनल Video मुरली विजयची क्रिकेट कारकिर्द मुरली विजय टेस्ट क्रिकेटमधील यशस्वी ओपनर आहे. विजयनं 2008 साली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. त्याने 61 टेस्टमध्ये 38.29 च्या सरासरीनं 3982 रन केले असून यामध्ये 12 शतक आणि 15 अर्धशतकांचा समावेश आहे. चेन्नई सुपर किंग्सच्या आयपीएल विजेत्या टीमचाही तो सदस्य होता. विजयनं आयपीएल कारकिर्दीमध्ये 106 मॅचमध्ये 121.87 च्या स्ट्राईक रेटनं 2619 रन केले आहेत. यामध्ये 2 शतक आणि 13 अर्धशतक त्यानं झळकावली आहेत.