मुंबई, 20 जुलै- ‘चला हवा येऊ द्या’च्या माध्यमातून अख्ख्या महाराष्ट्राला पोट धरुन हसायला भाग पाडणारा विनोदवीर आणि अभिनेता म्हणजे कुशल बद्रिके होय. कुशल आज आपला वाढदिवस साजरा करत आहे. चाहते आणि त्याचा मित्रपरिवार सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत. आज या खास निमित्ताने आपण कुशलच्या लव्हस्टोरीबाबत जाणून घेऊया. कुशल बद्रिकेला आज कोण ओळखत नाही? या कलाकाराने मनोरंजनसृष्टीत आपलं भक्कम स्थान तर निर्माण केलंच आहे शिवाय प्रेक्षकांच्या मनात घर केलं आहे. कुशलचा मोठा चाहतावर्ग आहे. लहानांपासून ते वयोवृद्धांपर्यंत प्रत्येक व्यक्ती कुशलच्या प्रेमात आहे. आज आपल्या करिअरमध्ये तो यशाच्या शिखरावर आहे. त्याच्याकडे विविध प्रोजेक्ट्स घर, कार, पैसे सगळंकाही सुख आहे. मात्र एक काळ असा होता की अभिनेत्याच्या जेवणाचेसुद्धा वांदे व्हायचे. अभिनेत्याला हे यश एका रात्रीत मिळालंय असं अजिबात नाहीय. कुशलने अनेक वर्ष कष्ट केल्यांनतर आज त्याने हे शिखर गाठलं आहे. मात्र या सर्व कठीण परिस्थिती तिच्या सोबत एक व्यक्ती अगदी खंबीरपणे उभी होती. आणि ती व्यक्ती इतर कुणी नसून त्याची प्रेयसी होती. तीच आज कुशलची पत्नी आहे. तिचं नाव सुनैना असं आहे. आज आपण या दोघांची लव्हस्टोरी जाणून घेणार आहोत
**(हे वाचा:** Mukta Barve: ‘चहा आणि आपल्यामध्ये फक्त..’, मुक्ता बर्वेची भन्नाट मान्सून स्पेशल पोस्ट एकदा पाहाच ) कुशलने एका कार्यक्रमादरम्यान सांगितलं होतं की, ‘त्याचे वडील आजारी असायचे. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु होते. त्यामुळे पैशांची मोठी चणचण होती. त्यात नाटकाचे प्रयोग कधी व्हायचे कधी नाही. आणि त्यातही नाटकाचे भत्ते वेळेवर मिळायचे नाहीत. त्यामुळे खायचं काय हा प्रश्न निर्माण व्हायचा. अशातच माझ्या बॅगेत एक मुलगी कायम 50-60 रुपये ठेवायची. त्यामुळे माझं खाणं-पिणं, येणं-जाणं सर्वकाही भागायचं. आणि ही मुलगी दुसरी कुणी नव्हती तर तेव्हाची त्यांची प्रेयसी आणि आता पत्नी असलेली सुनैना आहे. या हरहुन्नरी कलाकाराला News 18 लोकमतकडून वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.