मुंबई, 20 फेब्रुवारी : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्या सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी नवी मुंबईतील पक्षाच्या कार्यक्रमाला उपस्थिती लावली होती. यावेळी त्यांनी एक मोठा खुलासा केला. साताऱ्यात पावसात शरद पवारांनी (Sharad Pawar Satara Sabha) केलेलं भाषण आजही जनतेच्या मनात आहे. निवडणुकीपूर्वी नेमक्या या सभेनेच बाजी जिंकल्याचं म्हटलं जातं. जितेंद्र आव्हाड यांनी राष्ट्रवादी पक्षाच्या कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित केला होता. यावेळी व्यासपीठावर शशिकांत शिंदे, जितेंद्र आव्हाड उपस्थित होते. कार्यक्रमात बोलताना सुप्रिया सुळेंनी एक मोठं गुपित फोडलं. साताऱ्यात दीड वर्षांपूर्वी शरद पवारांनी पावसात केलेल्या भाषणाबद्दल महत्त्वपूर्ण माहिती दिली. यावेळी त्या म्हणाल्या की, साताऱ्यातील पावसात झालेल्या सभेला साहेब कारणीभूत नाहीत, तर व्यासपीठावरील एक माणूस कारणीभूत आहे. आणि त्या माणसाचं नाव शशिकांत शिंदे आहे. त्यादिवशी त्यांचा वाढदिवस होता. मी बाहेर प्रचारात होते. त्यावेळी शशिकांत शिंदे यांनी मला फोन केला. आणि त्यांनी सॉरी म्हटलं. हे एकून मला जरा भीतीचं वाटली. साताऱ्यात सभा पार पडली, मात्र यामध्ये साहेब पावसामुळे भिजून गेल्याचं शशिकांत शिंदेंनी सांगितलं. शरद पवार 80 वर्षांचे आहेत, शिवाय त्यांच्या पायाला जखम झाल्याने मला जर भीतीचं वाटली. मात्र शशिकांत शिंदे म्हणाले की, साहेब आणि मी कशाचीही पर्वा न करता सभा घेण्याचा निर्णय घेतला. लढायचंच आहे तर पूर्ण ताकदीनिधी लढू असं ते म्हणाले. हे ही वाचा- सतर्क रहे, सुरक्षित रहे’, कोरोनाची साखळी तोडण्यासाठी शरद पवारांनी दिला हा सल्ला
या सभेत सुप्रिया सुळेंनी सांगितलं की, साताऱ्यातील सभा शरद पवार आणि शशिकांत शिंदे यांनी घेतली व ती यशस्वी झाली. या सभेला एक कॅमेरामॅनदेखील नव्हता. सभा रद्द झाल्याचं अनेकांना वाटतं होतं. मात्र कसंबसं करीत एका कॅमेरामॅनला बोलावण्यात आलं. तोदेखील पावसामुळे त्याचा दीड लाखांचा कॅमेरा कसाबसा घेऊन उभा होता. आणि त्या दिवशी देशाच्या टर्निंग पॉइंटचा महत्त्वाचा फोटो क्लिक करण्यात आल्याचं सुप्रिया सुळे यावेळी म्हणाल्या.