मनोज कुलकर्णी, प्रतिनिधीघाटकोपर, 10 जून : मुंबईत कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे.एकीकडे डॉक्टर कोरोनाग्रस्त रुग्णांना वाचविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करीत आहेत. मात्र, रुग्ण थोडे फार बरे होताच डॉक्टर आणि रुग्णालयाशीच गैरवर्तन करीत असल्याचे समोर येत आहे. अशा परिस्थितीत घाटकोपर भागातील हॉस्पिटलमधून मनसे नेत्याने कोरोना रुग्णाला पळवून नेण्याची धक्कादायक घटना घडली आहे.
घाटकोपरमध्ये चक्क एका रुग्णालाच मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी उपचार सुरू असताना पळवून नेले आहे. या रुग्णाचे बिल रुग्णालयाने जास्त लावले आहे आणि त्यांना धडा शिकविण्यासाठी हे केले असल्याची पोस्ट मनसैनिकांनी व्हायरल केल्या आहेत.
हेही वाचा -घरात वाहिला रक्ताचा पाट, चुलत भावानेच केली भावाची कुऱ्हाडीने वार करून हत्या
घाटकोपर परिसरातील एका व्यक्तीला कोरोनाची लागण झाल्याचं निष्पन्न झालं होतं. या व्यक्तीची पत्नी मनसेच्या कार्यकर्त्या आहेत. कोरोना झाल्याने 21 मेपासून घाटकोपरच्या हिंदुसभा रुग्णालयाच्या कामलेन येथील कोरोना केंद्रात उपचारासाठी दाखल झाले होते.
मात्र त्यांची तब्येत खालावली गेली तेव्हा त्यांना अतिदक्षता विभागात उपचारास दाखल करण्यात आले. 10 दिवस त्यांच्यावर आयसीयूमध्ये उपचार करण्यात आले. त्यामुळे त्यांचे बिल दोन लाखाच्या जवळपास झाले होते. मात्र, हे बिल जास्त असल्याचा आरोप करीत मनसेचे विभाग अध्यक्ष गणेश चुक्कल आणि इतर पदाधिकाऱ्यांनी या रुग्णाला कोरोना केंद्रातून पळून नेले.
हेही वाचा -झुंज अखेर अपयशी, कोरोनामुळे राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नगरसेवक मुकुंद केणी यांचं निधन
या प्रकारबाबत रुग्णालय प्रशासनाने घाटकोपर पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दिला असून आता पोलीस पुढील कारवाई करीत आहेत.
संपादन - सचिन साळवे
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.