घरात वाहिला रक्ताचा पाट, चुलत भावानेच केली भावाची कुऱ्हाडीने वार करून हत्या

घरात वाहिला रक्ताचा पाट, चुलत भावानेच केली भावाची कुऱ्हाडीने वार करून हत्या

प्रॉपर्टीच्या वादातून ही घटना घडली असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

  • Share this:

जुन्नर, 10 जून : पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील वारूळवाडी आनंदवाडी येथे नातेसंबंधाला काळिमा लावणारी घटना घडली असून सख्ख्या चुलत भावानेच भावाचा कुर्‍हाडीने डोक्यात व मानेवर घाव घालून खून केला असल्याचे उघडकीस आले आहे. प्रॉपर्टीच्या वादातून ही घटना घडली असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

आनंदवाडी येथील  अमोल उर्फ पामर भुजबळ (वय 28) याने महेश धनराज भुजबळ (वय 22) या आपल्या सख्ख्या चुलत भावाचा कुर्‍हाडीने डोक्यात आणि मानेवर घाव घालून खून केला आहे.

हे वाचा-पिंपरी चिंचवड हादरलं, प्रेम करण्याच्या संशयावरून तरुणाची निर्घृण हत्या

ही घटना मंगळवार 8 जून रोजी दुपारी घडली असल्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अर्जुन घोडे पाटील यांनी सांगितले. आरोपी अमोल भुजबळ हा गुन्हा केल्यानंतर फरार झाला असल्याचे घोडे पाटील यांनी सांगितले असून प्रथमदर्शनी प्रॉपर्टीच्या वादा मधून हा गुन्हा घडला असल्याचे समजते.

हे वाचा-दुहेरी हत्येनं औरंगाबाद हादरलं! बहिण-भावाची गळा चिरून निर्घृण हत्या

या प्रकरणाचा पुढील तपास जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप पाटील, उपविभागीय पोलिस अधिकारी दीपाली खन्ना यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक अर्जुन घोडे पाटील व त्यांची टीम करत आहे.

संपादन - सचिन साळवे

First published: June 10, 2020, 8:32 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading