Home /News /news /

झुंज अखेर अपयशी, कोरोनामुळे राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नगरसेवक मुकुंद केणी यांचं निधन

झुंज अखेर अपयशी, कोरोनामुळे राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नगरसेवक मुकुंद केणी यांचं निधन

कोरोनाची लागण झाल्यामुळे त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र, उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.

    ठाणे, 10 जून :  ठाण्यात कोरोना व्हायरसचा उद्रेक झाला आहे. दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढतच चालली आहे. अशातच राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नगरसेवक मुकुंद केणी यांचे निधन झाले आहे. कोरोनाची लागण झाल्यामुळे त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र, उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. मुकुंद केणी यांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले होते. मुकुंद केणी हे ठाण्यातील गरजू लोकांना मदत करत होते. याच दरम्यान, त्यांना कोरोनाची लागण झाली. 27 मे रोजी ही बाब निदर्शनास आली. तेव्हापासून त्यांच्यावर ठाण्यातील हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. हेही वाचा-मंत्रालयात दिवसभरात फक्त 20 कर्मचारी राहू शकतात उपस्थित, केंद्र सरकारचा नवा आदेश 9 जून रोजी रात्री त्यांची तब्येत अचानक खालावली. त्यामुळे उपचारादरम्यान पहाटे 3 वाजेच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली.  मुकुंद केणी यांच्या निधनामुळे  कार्यकर्ते, समर्थक आणि  कुटुंबावर दुखाचा डोंगर कोसळला आहे. राष्ट्रवादीचे नेते आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी मुकुंद केणी यांच्या निधनाबद्दल तीव्र दु:ख व्यक्त केलं आहे.  'राष्ट्रवादी काँग्रेसने आज आपला एक मजबूत शिलेदार गमावला' अशी भावना आव्हाड यांनी व्यक्त केली. ठाण्यातच कोरोनामुळे शिवसेना नगरसेवकाचे निधन दरम्यान, 9 जून रोजी कोरोनाची लागण झाल्यामुळे मीरा भाईंदरमधील शिवसेना नगरसेवक हरिशचंद्र आमगावकर यांचं ठाण्याच्या वेदांत रुग्णालयात निधन झालं. शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी सोशल मीडियावर याबाबतची माहिती देत त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. हेही वाचा-जगातल्या दिग्गज Emirates Airlinesने 600 पायलट्सना दिला नारळ आठवड्यापूर्वी नगरसेवक हरिशचंद्र आमगावकर यांच्या आई, पत्नी आणि भाऊ यांना देखील कोरोनाची लागण झाली होती. यामध्ये त्यांच्या पत्नीला डिस्चार्ज देण्यात आला होता तर भाऊ आणि आई या सध्या वेदांत हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत. हरिशचंद्र आमगावकर हे मीरा भाईंदर महानगरपालिकेतमध्ये दोन टर्म नगरसेवक होते. तर या अगोदर त्यांनी स्थायी समितीचे अध्यक्षपद देखील भूषवले होते. सध्या ते महानगरपालिका शिवसेनेचे गटनेते म्हणून होते, तर आमदार प्रताप सरनाईक यांचे अत्यंत विश्वासू म्हणून ओळख होती. याबाबत आमदार प्रताप सरनाईक यांनी सोशल मीडीयावर कोरोनामुळे हरिशचंद्र आमगावकर यांचं निधन झाल्याचे नमूद करून श्रद्धांजली अर्पण केली आहे. संपादन - सचिन साळवे
    Published by:sachin Salve
    First published:

    Tags: ठाणे

    पुढील बातम्या