जाहिरात
मराठी बातम्या / मुंबई / सोसायटीत अचानक खड्डा पडला आणि कार बुडाली, BMC ने सांगितले खरे कारण... VIDEO

सोसायटीत अचानक खड्डा पडला आणि कार बुडाली, BMC ने सांगितले खरे कारण... VIDEO

सोसायटीत अचानक खड्डा पडला आणि कार बुडाली, BMC ने सांगितले खरे कारण... VIDEO

सोसायटीच्या आवारात एक विहीर आहे. या विहिरीच्या अर्ध्या भागावर ‘आरसीसी’ करून ती विहीर झाकण्यात आली होती.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 13 जून: पहिल्याच पावसाने मुंबईला (Mumbai) झोडपून काढले आहे. ठिकठिकाणी पाणी साचल्यामुळे छोट्यामोठ्या दुर्घटना घडल्या आहे. अशातच घाटकोपरमध्ये (ghatkopar) एका सोसायटीमध्ये पार्किंगमध्ये अचानक खड्डा पडला आणि कार पाण्यात बुडाली. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून विरोधकांनी मुंबई पालिकेवर (mumbai municipal corporation) आरोप केले आहे. अखेर पालिकेनं या प्रकरणाचा खुलासा केला आहे. कारच्या या घटनेशी महापालिकेचा दूरान्वयानेही  संबंध नाही. ही घाटकोपर भागातील खासगी सोसायटीतील घटना आहे. घाटकोपर पश्चिम परिसरातील एका खासगी सोसायटीच्या परिसरात उभी असलेली एक कार पाण्यात बुडत असल्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्यानंतर महानगरपालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन खात्याद्वारे कळविण्यात आले आहे की, सदर व्हिडिओतील घटना 13 जून 2021 रोजी सकाळी घाटकोपर पश्चिम परिसरात घडलेली आहे.

सदर सोसायटीच्या आवारात एक विहिर आहे. या विहिरीच्या अर्ध्या भागावर ‘आरसीसी’ करून ती विहीर झाकण्यात आली होती. त्या ‘आरसीसी’ केलेल्या भागावर सोसायटीतील रहिवाशी ‘कार पार्क’ करीत असत. हाच ‘आरसीसी’ चा भाग खचून त्यावर ‘पार्क’ केलेली एक कार  पाण्यात बुडाली, अशी प्राथमिक माहिती मिळाली आहे. सदर कारमध्ये कोणीही नसल्याने घटनेत कोणतीही मनुष्यहानी झालेली नाही, तसेच कोणीही जखमी झालेले नाही. पुरुषांना भारी पडतंय Work From Home; पुण्यात हेल्पलाईनवर होतेय मदतीची मागणी या अनुषंगाने महापालिकेच्या संबंधित विभाग कार्यालयाद्वारे पाणी उपसण्याच्या कामाचे समन्वयन करण्यात येत आहे. तसेच सदर ठिकाणी सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक ती उपाय योजना तातडीने करण्यास संबंधित सोसायटीला सूचित करण्यात आले आहे. घाटकोपर पोलीस ठाण्याचे अधिकारी  आणि कर्मचारी देखील सदर घटनास्थळी हजर आहेत. गेल्या चार दिवसांपासून मुंबईत मुसळधार पाऊस झाला आहे. त्यामुळे या सोसायटीतील विहिरीची पाणी पातळी वाढली होती. त्यामुळे जमीन पोकळ झाली आणि आरसीसीचे छत कारच्या वजनाने कोसळले असावे, असाही अंदाज वर्तवला जात आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: BMC , mumbai
  • First Published :
जाहिरात
जाहिरात