रवी शिंदे (ठाणे), 08 डिसेंबर : ठाण्यातील भिवंडीमध्ये गोळाबाराचा थरारक प्रकार घडला. यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा निकटवर्तीयांमधील कामगार पुरवणाऱ्या गणेश कोकाटेंवर गोळीबार करून हत्या करण्यात आली. भिवंडी तालुक्यातील कशेळी येथे अज्ञातांनी केलेल्या गोळीबारात तरुणाचा ठाणे येथील खाजगी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना रात्री घडली. गणेश कोकाटे याचे (वय 33) होते.
हे ही वाचा : 22 वर्षाच्या चोराने बँक लुटली; पण पळून जाण्यासाठी कॅब बूक केली अन् असा फसला डाव
ठाणे येथील कामगार पुरविण्याचे काम करणाऱ्या दोघांमधील वाद विकोपाला जाऊन एकाची हत्या करण्यात आली आहे. दरम्यान हत्या झालेला तरूण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटातील असल्याचे बोलले जात आहे. ठाणे येथील लोढामध्ये कामगार पुरविण्याच्या काम गणेश कोकाटे करत होता. दरम्यान गणेश कोकाटे आणि गणेश इंदुलकर यांच्यात मागच्या काही काळापासून वाद होता.
यापूर्वी गणेश कोकाटेवर गणेश इंदुलकर याने गोळीबार केला होता. त्यामध्ये चितळसर मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून चार जणांना अटक करण्यात आली आहे. यातील गणेश इंदुलकर हा फरार होता. त्यानंतर बुधवारी रात्री गणेश कोकाटे ठाणे येथून कशेळी येथील घरी येत असताना काही अज्ञातांनी दुचाकीवरून आलेल्या आरोपीने गोळीबार कोकाटेंवर हल्ला करून फरार झाले.
हे ही वाचा : पनवेल: सोनाराच्या डोळ्यात मिरची पूड टाकून पळवले दागिने; या कारणामुळे काहीच वेळात चोराने स्वतःच परत केले
या घटनेनंतर गंभीर जखमी गणेश यास ठाण्यातील ज्युपिटर रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता डॉक्टरांनी त्यास मृत घोषीत केले. व्यवसायिक वादातून ही हत्या झाली असून पोलिसांनी तीन पथके तयार करून फरार आरोपीचा शोध घेत असल्याची माहिती नारपोली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मदन बल्लाळ यांनी दिली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Murder, Murder news, Thane (City/Town/Village), Thane crime, Thane crime news, Thane police