नवी दिल्ली 05 डिसेंबर : जगात प्रत्येक गोष्टीत रोज नवे प्रयोग होत असतात. अंतराळात पोहोचण्याचा विषय असो किंवा समुद्राच्या आतील जगात काहीतरी नवीन शोधण्याचा विषय असो, सर्वत्र संशोधन आणि प्रयोग सुरू आहेत. चोरी आणि लूट करणारे लोकही अनेकदा नवे प्रयोग करतात. असंच एक प्रकरण आता समोर आलं आहे. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की आजकाल सामान्य लोकांप्रमाणेच चोर देखील चोरीकरता जाण्यासाठी आणि परतण्यासाठी कॅबचा वापर करू लागले आहेत.
मंदिरात चोरी करायला गेला चोर; समोर देव दिसताच जे केलं ते पाहून चक्रावून जाल, VIDEO
एका 22 वर्षीय चोराने बँक लुटण्यासाठी दुचाकी किंवा कार वापरली नाही किंवा तो गुपचूप लपून निघून गेला नाही. तर, त्याने टॅक्सी बुक करून तिथून पळून जाण्याचा प्लॅन केला आणि त्यात तो बऱ्यापैकी यशस्वीही झाला. ही संपूर्ण घटना फ्लोरिडातील असून एका दरोडेखोराने बँक लुटण्यासाठी चक्क Uber कॅबचा वापर केला आहे.
जेवियर रफेल नावाच्या 22 वर्षीय चोराला फ्लोरिडा येथून पोलिसांनी पकडलं. जेवियर नावाच्या चोराने Des Moinesबँक लुटल्यानंतर Uber कॅब बुक केल्याचा आरोप आहे. ड्रायव्हर त्याच्याजवळ पोहोचल्यावर त्याने त्याच्या डोक्याला बंदूक लावून कार ताब्यात घेतली आणि दरोडा टाकून तेथून पळ काढला. तो हायवे 35 वरही खूप दूर गेला होता आणि पोलिसांनी त्याला पकडले तेव्हा तो यूएस-कॅनडा सीमेपासून थोड्याच अंतरावर होता.
पतीला सोडून बहिणीसोबत हनिमूनला गेली नवरी; संपूर्ण सत्य समजताच नवरदेवाची पोलिसांत धाव
Des Moines पोलीस विभागाचे पॉल परिजेक यांच्या म्हणण्यानुसार, चोरीची तक्रार प्रथम बँकेने पोलिसांना दिली होती आणि नंतर Uber कॅब ड्रायव्हरलाही पटकन हा प्रकार समजला. संशयिताची ओळख पटल्यानंतर पोलिसांनी चोराचा शोध सुरू केला. हा चोर यूएस-कॅनडा सीमा ओलांडण्यापूर्वी त्याच कॅबमध्ये सापडला. जेवियरवर फर्स्ट डिग्री रॉबरीचा आरोप आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Crime news, Theft