जाहिरात
मराठी बातम्या / क्राईम / पनवेल: सोनाराच्या डोळ्यात मिरची पूड टाकून पळवले दागिने; या कारणामुळे काहीच वेळात चोराने स्वतःच परत केले

पनवेल: सोनाराच्या डोळ्यात मिरची पूड टाकून पळवले दागिने; या कारणामुळे काहीच वेळात चोराने स्वतःच परत केले

प्रतिकात्मक फोटो

प्रतिकात्मक फोटो

हे चोर पळून जाण्याच्या तयारीत असतानाच दुकान मालकाने आरडाओरडा केल्याने आजूबाजूच्या लोकांनी त्यांचा पाठलाग केला. यानंतर आरोपींनी तो दागिन्यांचा बॉक्स दुकानाच्या बाहेर टाकून पळ काढण्याची घटना पनवेल शहरात घडली आहे .

  • -MIN READ Raigad,Maharashtra
  • Last Updated :

प्रमोद पाटील, पनवेल 07 डिसेंबर : पनवेलमधून चोरीची एक अजब घटना समोर आली आहे. यात दुकानात सोने खरेदी करण्याच्या बहाण्याने आलेल्या दोन अनोळखी इसमांनी चोरीचा प्रयत्न केला. त्यांनी सोनाराच्या डोळ्यात मिरची पूड टाकून दुकानातील सोन्याच्या दागिन्यांचा बॉक्स घेऊन पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांचा हा प्रयत्न फसला. 22 वर्षाच्या चोराने बँक लुटली; पण पळून जाण्यासाठी कॅब बूक केली अन् असा फसला डाव हे चोर पळून जाण्याच्या तयारीत असतानाच दुकान मालकाने आरडाओरडा केल्याने आजूबाजूच्या लोकांनी त्यांचा पाठलाग केला. यानंतर आरोपींनी तो दागिन्यांचा बॉक्स दुकानाच्या बाहेर टाकून पळ काढण्याची घटना पनवेल शहरात घडली आहे . मुस्तकीम नुरुल तरफदार यांचे जैन मंदिराजवळ एम.एम. ज्वेलर्स या नावाने दुकान आहे. तिथेच हा प्रकार घडला. मुस्तकीम नुरुल तरफदार सदर दुकानात बसले असताना दोन अनोळखी इसम ग्राहक बनून त्यांच्या दुकानात आले. त्यांनी सोन्याचे दागिने पाहण्यास सुरुवात केली. यानंतर सोन्याचे दागिने पाहत असताना अचानकपणे एका इसमाने त्यांच्या डोळ्यात मिरची पूड टाकली आणि दुकानातील सोन्याच्या दागिन्यांचा बॉक्स घेऊन पळून जाण्याच्या प्रयत्न दोघांनी केला. मंदिरात चोरी करायला गेला चोर; समोर देव दिसताच जे केलं ते पाहून चक्रावून जाल, VIDEO यानंतर लगेचच दुकान मालकाने आरडाओरडा केली. त्यामुळे आजूबाजूच्या लोकांनी त्यांचा पाठलाग केला. यानंतर आरोपींनी तो दागिन्यांचा बॉक्स दुकाना बाहेर टाकून पळ काढण्याची घटना घडली आहे. पळून जाताना ते सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहेत. मिरचीची पूड डोळ्यात टाकून सोनार व्यापाऱ्याला लुटण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार पनवेलमध्ये घडला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात