मुंबई, 30 जुलै : फोन टॅप प्रकरणातील गोपनिय माहिती विरोधी पक्षाच्या हाती लागल्यामुळे महाविकास आघाडी सरकारने (mva government) अधिकाऱ्यांच्या बदल्याचा धडका लावला आहे. आता मंत्रालयातील (mantralaya ) तब्बल 103 सहाय्यक कक्ष अधिकाऱ्यांच्या बदल्या करून सरकारी बाबूंना चांगलाच दणका दिला आहे. तसंच, या आदेशाविरोधात भूमिका घेतल्यास कारवाईचा इशाराही देण्यात आला आहे.
मुंबई पोलीस दल आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बदल्यांचं सत्र सुरूच आहे. आता राज्याचा गाडा ज्या मंत्रालयातून हाकला जातोय तेथील अधिकाऱ्यांची उलबांगडी करण्यात आली आहे.
मंत्रालयामध्ये एकाच वेळी 103 सहायक कक्ष अधिकारी यांच्या बदल्या करण्याचा आदेश काढण्यात आला आहे. एकाच संयुक्त आदेशाने बदल्यांची ऑर्डर काढण्यात आली आहे. या आदेशामुळे अधिकारी वर्गामध्ये चांगलीच खळबळ उडाली आहे. गृह, सामान्य प्रशासन, उद्योग, शालेय शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांना या आदेशामुळे मोठा धक्का मानला जात आहे.
मेरीकोमच्या पराभवावर वाद, मॅचच्या 1 मिनीटआधी काय झालं? धक्कादायक खुलासा
विशेष म्हणजे, हे आदेश कार्यमुक्तीचे आदेश असून त्याबद्दल संबंधित विभागाला दुसरे आदेश काढण्याची आवश्यकता नाही. सदरील कर्मचाऱ्यांना २ ऑगस्ट २०२१ रोजी बदलीच्या ठिकाणी रुजू व्हावे लागणार आहे. जर अधिकारी रूजू झाल्याचे दिसून आले नाही तर त्यांच्याविरोधात शासन निर्णय २३ डिसेंबर २०१६ शिस्तभंगविषयक कारवाई करण्यात येईल.
बदली झालेल्या कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी जर बदली रद्द करणे, शिफारस करणे, दबावासाठी पत्र जोडल्यास त्यांची ही कृती गैरवर्तणूक समजली जाईल आणि त्यांच्याविरोधात कठोर कारवाई केली जाईल, असा इशाराच देण्यात आला आहे.
'फुकट बिर्याणी' ऑर्डर प्रकरणाला नवे वळण, प्रियंका नारनवरेंनी केला नवा दावा
तसंच, आहरण व संवितरण अधिकारी, अधिदान व लेखाधिकारी यांचा कळविण्यात येते की, उपरोक्त कर्मचाऱ्यांचे २ ऑगस्ट २०२१ पासूनचे वेतन कोणत्याही परिस्थितीत पूर्वीच्या विधातून अदा करण्यात येऊ नये अन्यथा त्यांना व्यक्तीश: जबाबदार धरण्यात येईल, अशी कडक सूचनाही देण्यात आली आहे.
ज्या कर्मचारी आणि अधिकाऱ्यांची बदली झाले आहे, तिथे रू झाल्यावर तातडीने माहिती सामन्य प्रशासन विभागाला त्वरीत सादर करावी लागणार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.