मराठी बातम्या /बातम्या /पुणे /'फुकट बिर्याणी' ऑर्डर प्रकरणाला नवे वळण, प्रियंका नारनवरेंनी सांगितली Audio clip व्हायरल करणाऱ्यांची नावं!

'फुकट बिर्याणी' ऑर्डर प्रकरणाला नवे वळण, प्रियंका नारनवरेंनी सांगितली Audio clip व्हायरल करणाऱ्यांची नावं!

 पुणे पोलिसांची अब्रू वेशीवर टांगली आता अधिकारींच्या राजकारणातून हे घडल्याचं रेकॉर्डवर सांगणाऱ्या प्रियंका नारनवरे यासंदर्भात अधिकृत तक्रार देणार का असा प्रश्न आहे.

पुणे पोलिसांची अब्रू वेशीवर टांगली आता अधिकारींच्या राजकारणातून हे घडल्याचं रेकॉर्डवर सांगणाऱ्या प्रियंका नारनवरे यासंदर्भात अधिकृत तक्रार देणार का असा प्रश्न आहे.

पुणे पोलिसांची अब्रू वेशीवर टांगली आता अधिकारींच्या राजकारणातून हे घडल्याचं रेकॉर्डवर सांगणाऱ्या प्रियंका नारनवरे यासंदर्भात अधिकृत तक्रार देणार का असा प्रश्न आहे.

पुणे, 30 जुलै : पुणे पोलिसांच्या उपायुक्‍त प्रियंका नारनवरे यांनी पोलीस कर्मचाऱ्यांना फुकट बिर्याणी (Free biryani)  घरी आणून देण्याच्या आदेशाची ऑडिओ क्लिप व्हायरल  (Pune DCP audio clip viral) झाल्यानंतर पुणे पोलीस दलाची मोठी नाचक्की झाली आहे . या प्रकरणात आपल्या विरुद्ध षड्यंत्र असल्याचा दावा नारनवरे यांनी केला आहे. एवढंच नाहीतर ती क्लिप एका डीसीपी आणि पोलीस कर्मचाऱ्याने व्हायरल केल्याचंही त्यांनी सांगितलं. त्यांच्या या दाव्यामुळे पोलीस दलातील राजकारण समोर आलं आहे.

पुणे पोलिसांच्या मध्यवर्ती शहराच्या भागातल्या प्रमुख आयपीएस अधिकारी असलेल्या प्रियंका नारनवरे यांनी चक्क कर्मचाऱ्याला एस.पी. बिर्याणी मधून फुकट बिर्याणी आणण्याची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आणि पुणे पोलिसांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. एसपी बिर्याणी च्या साजुक तुपातल्या बिर्याणीसह नल्ली निहरी प्रॉन्स फ्राय अशा वेगवेगळ्या मेंदूची चर्चा करणारी ही ऑडिओ क्लिप पुणे पोलिसांसाठी आज मोठी डोकेदुखी ठरली आहे.

जॉन वरच्या पोलीस उपायुक्त असलेल्या आयपीएस प्रियंका नारनवरे यांना तब्बल 88 हजार रुपये पगार आहे. मात्र आपल्या पोलीस कर्मचाऱ्याला हद्दीतील सर्वात लोकप्रिय असलेल्या हॉटेलमधून मटन बिर्याणी पैसे न देता घेऊन येण्यासाठी आदेश दिल्याची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली. त्यामुळे इतक्या मोठ्या हुद्द्यावर ती असलेला अधिकारी अशा पद्धतीने भ्रष्टाचाराला पाठबळ कसा देऊ शकतो, असा प्रश्न उपस्थित झाला आहे काय आहे.

ही ऑडिओ क्लिप इतकी व्हायरल झाली मंत्र्यांनाही त्याची दखल घ्यावी लागली. पुणे पोलीस दलाचे प्रमुख असलेले पोलीस आयुक्त दोन दिवस या क्लिपवर काय कारवाई करणार हे सांगत नव्हते मात्र राज्याच्या गृहमंत्र्यांनी थेट या प्रकरणाची चौकशी करून अहवाल देण्याचे आदेश दिले.

फुकट बिर्याणीच्या आरोप ज्या आधिकार्‍यांवर झालेत त्या आयपीएस प्रियंका नारनवरे यांच्याशी आम्ही बोललो, तेव्हा त्यांनी हे आपल्या विरोधातील षड्यंत्र आहे असा दावा केला आहे. हे षड्यंत्र दुसरे तिसरे कुणी नाही तर पुणे पोलीस दलातील एक डीसीपी आणि पोलीस कर्मचाऱ्यांनी केला असा दावाही त्यांनी केला आहे.  या ऑडिओ क्लिपने आधीच पुणे पोलिसांची अब्रू वेशीवर टांगली आता अधिकारी यांच्या मधल्या राजकारणातून हे घडल्याचं रेकॉर्डवर सांगणाऱ्या प्रियंका नारनवरे यासंदर्भात अधिकृत तक्रार देणार का असा प्रश्न आहे. इतकं सगळं होऊनही पुण्याचे पोलीस आयुक्त गप्प आहेत. पोलिसांमध्ये खरंच राजकारण सुरू आहे का? असा प्रश्नही या निमित्ताने उपस्थित होतो.

First published:
top videos

    Tags: Pune