मुंबई, 08 मार्च : जागतिक महिला दिनाच्या (Women’s Day) निमित्ताने ठाकरे सरकारने महाराष्ट्रातील तमाम महिलांना खास असे हक्काचे गिफ्ट दिले आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी राज्याचा अर्थसंकल्प (Maharashtra budget 2021) सादर केला आहे. यात महिलांच्या नावे घर घेतल्यास मुद्रांक शुल्कात सूट देण्याची घोषणा अजित पवार यांनी केली आहे. अजित पवार यांनी राज्यातील महिलांसाठी राजमाता जिजाऊ गृहस्वामिनी योजनेची घोषणा केली आहे. ज्या महिलेमुळे घराला घरपण येते, त्या घरावर तिचे नांव असावे , ही माझ्या मायभगिनींची अपेक्षा अवाजवी नाही. महिला सक्षमीकरणाच्या प्रक्रीयेचाच तो भाग आहे. राज्यातील तमाम महिलांच्या अपेक्षेला न्याय देणारी राजमाता जिजाऊ गृहस्वामिनी योजना घोषित करण्यात आली आहे. कोणतेही कुटुंब यापुढे राज्यात घर विकत घेईल, तेव्हा त्याची नोंदणी गृहलक्ष्मीच्या नावावर व्हावी व ती खऱ्या अर्थाने गृहस्वामिनी बनावी, यासाठी प्रोत्साहन म्हणून दि. 01 एप्रिल 2021 पासून गृहखरेदीची नोंदणी त्या कुटुंबातील महिलेच्या नावावर झाल्यास मुद्रांक शुल्काच्या प्रचलित दरामध्ये सवलत देण्यात येईल’ अशी घोषणा अजित पवार यांनी केली. 3 फुटबॉल मैदानाएवढ्या आकाराचा अपोफिस लघुग्रह पृथ्वीजवळून जाणार, 2029 मध्ये धोका! महिलेच्या नावाने घर घेतल्यास मुद्रांक शुल्कात 1 टक्का सवलत दिली जाणार आहे. त्यामुळे राज्याच्या महसुलामध्ये १००० कोटीची तूट येण्याची शक्यता आहे, असंही अजित पवारांनी स्पष्ट केलं. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले विद्यार्थीनी प्रवास सवलत योजना ‘आपले राज्य हे महिला धोरणाच्या बाबतीत नेहमीच अग्रेसर राज्य आहे. मुलींच्या शिक्षणासाठी राज्याने अनेक प्रागतिक पावले उचलली आहेत. मुलींचे बारावीपर्यंतचे शिक्षण मोफत केले आहे. आता राज्यातील सर्व ग्रामीण तालुक्यातील विद्यार्थिंनींना आपल्या गावापासून शाळेपर्यंत जाण्यासाठी राज्य परिवहन महामंडळाच्या बसने मोफत प्रवासाची सोय उपलब्ध करून देणारी राज्यव्यापी योजना जाहीर करण्यात आली आहे. ही योजना क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या नावाने सुरु करण्यात येईल. या योजनेसाठी शासनाकडून राज्य परिवहन महामंडळास पर्यावरणपूरक दीड हजार सीएनजी व हायब्रीड बस प्राधान्याने उपलब्ध करून देण्यात येतील’ हिम्मत असेल तर समोर ये’; अॅसिड हल्ल्याची धमकी देणाऱ्याला अभिनेत्रीचं आव्हान मोठया शहरातील महिलांच्या सुलभ व सुरक्षित प्रवासासाठी “तेजस्विनी योजने” अंतर्गत आणखी विशेष महिला बस उपलब्ध करुन देण्याची घोषणाही अजित पवारांनी केली. ‘आंतरराष्ट्रीय कृषी विकास निधी (IFAD) सहाय्यित “नवतेजस्विनी महाराष्ट्र ग्रामीण महिला उद्यम विकास” हा एकूण 522 कोटी 98लाख रूपये खर्चाचा प्रकल्प असून हा प्रकल्प सहा वर्षांच्या कालावधीकरीता राबविण्यात येणार आहे. त्या माध्यमातून स्वयंसहाय्यता बचत गटातील दहा लाख महिलांना उपजिविकेसाठी साधने तर उपलब्ध होतीलच, शिवाय त्यांच्या व्यवसायामध्ये मूल्यवृध्दीदेखील होईल’ असंही अजित पवारांनी सांगितले. महिला व बाल सशक्तीकरण योजना महिला व बाल सशक्तीकरण योजनेसाठी जिल्हा वार्षिक योजनेच्या 3 टक्के नियतव्यय राखून ठेवण्याचा निर्णयही आपण घेतला आहे. त्यातून प्रत्येक वर्षी किमान 300 कोटी रुपये नियतव्यय उपलब्ध होईल. आजच्या महिला दिनाच्या निमित्ताने राज्य राखीव पोलीस दलाचा राज्यातील पहिला स्वतंत्र महिला गट स्थापन करण्याची घोषणाही अजित पवारांनी केली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.