मराठी बातम्या /बातम्या /देश /

तीन फुटबॉल मैदानाएवढ्या आकाराचा अपोफिस लघुग्रह पृथ्वीजवळून जाणार, 2029 मध्ये धोका!

तीन फुटबॉल मैदानाएवढ्या आकाराचा अपोफिस लघुग्रह पृथ्वीजवळून जाणार, 2029 मध्ये धोका!

अपोफिस आयफेल टॉवर इतका उंच असून त्याची रुंदी 1120 फूट किंवा 340 मीटर (Asteroid Apophis Size) आहे. पुढच्यावेळी जेव्हा तो पृथ्वीजवळून जाणार आहे तेव्हा पृथ्वीला धोका असू शकतो, असं नासाचं म्हणणं आहे.

अपोफिस आयफेल टॉवर इतका उंच असून त्याची रुंदी 1120 फूट किंवा 340 मीटर (Asteroid Apophis Size) आहे. पुढच्यावेळी जेव्हा तो पृथ्वीजवळून जाणार आहे तेव्हा पृथ्वीला धोका असू शकतो, असं नासाचं म्हणणं आहे.

अपोफिस आयफेल टॉवर इतका उंच असून त्याची रुंदी 1120 फूट किंवा 340 मीटर (Asteroid Apophis Size) आहे. पुढच्यावेळी जेव्हा तो पृथ्वीजवळून जाणार आहे तेव्हा पृथ्वीला धोका असू शकतो, असं नासाचं म्हणणं आहे.

नवी दिल्ली 08 मार्च : गेल्या शुक्रवारी युरोपीय वेळेनुसार रात्री 8 वाजून 15 मिनिटांनी पृथ्वीच्या पृष्ठभागापासून 10.4 मिलियन मैल अंतरावरून अपोफिस (Apophis) नावाचा एक लघुग्रह भ्रमण करत गेला. हे अंतर पृथ्वीपासून चंद्राच्या अंतराच्या 44 पट अधिक होतं. अपोफिस आयफेल टॉवर इतका उंच असून त्याची रुंदी 1120 फूट किंवा 340 मीटर (Asteroid Apophis Size) असेल. या रुंदीचा साध्या सोप्या भाषेत अंदाज द्यायचा झाला तर त्याची रुंदी फुटबॉलच्या साडेतीन मैदांनांइतकी आहे. हा लघुग्रह आता पृथ्वीजवळून गेला त्याचा कोणताही धोका पृथ्वीला नव्हता. पण पुढच्यावेळी जेव्हा तो पृथ्वीजवळून जाणार आहे तेव्हा मात्र पृथ्वीला धोका असू शकतो, असं नासाचं (National Aeronautics and Space Administration) म्हणणं आहे.

अमेरिकेची राष्ट्रीय खगोलविज्ञान संस्था नासाच्या अभ्यासानुसार हा अपोफिस 13 एप्रिल 2029 ला पुन्हा एकदा पृथ्वीजवळून जाणार आहे आणि तेव्हा तो 19 हजार मैलांच्या अंतरावरून म्हणजे खूपच जवळून भ्रमण करेल. तेव्हा तो पृथ्वी आणि चंद्राच्या मधून प्रवास करेल. एवढा मोठा लघुग्रह पृथ्वीच्या इतक्या जवळून जाण्याची ती पहिली खगोलशास्रीय घटना असेल. त्यामुळे त्या घटनेला प्रचंड महत्त्व असेल असंही नासाने म्हटलं आहे.

अपोफिस पृथ्वीच्या इतक्या जवळून जाणार आहे की सध्या पृथ्वीभोवती भ्रमण करणाऱ्या स्पेसक्राफ्टच्या कक्षेतूनही जाऊ शकतो. 16 ते 33 फूट किंवा 5 ते 10 मीटरचे लघुग्रह पृथ्वीपासून याच अंतरावरून जाताना या आधी निरीक्षित केले गेले आहे पण अपोफिसएवढा मोठा लघुग्रह इतक्या जवळून कधी गेला नाही.

नासाने 2029 मध्ये अपोफिस पृथ्वीजवळून जाताना कशी स्थिती असेल याचा अंदाज वर्तवला आहे. त्यानुसार या लघुग्रहाचं भ्रमण रात्रीच्या आकाशात नुसत्या डोळ्यांनी पाहता येणार आहे. ऑस्ट्रेलियाच्या पूर्वेकडून पश्चिमेकडे एक प्रकाश शलाका जाताना नुसत्या डोळ्यांनी दिसणार आहे. त्यानंतर अपोफिस भारतीय महासागरावरून पश्चिमेकडे जाईल आणि आफ्रिकेच्या वर तो इक्वेटरला पार करेल. 13 एप्रिल 2029 या दिवशी ईस्टर्न टाइम झोननुसार संध्याकाळी 6.00 पूर्वी अटलांटिक समुद्राच्यावर असेल आणि तेव्हाच तो पृथ्वीपासून सर्वांत जवळच्या अंतरावर असेल. त्याचा वेग प्रचंड असणार आहे तो एका तासात अटलांटिक समुद्राला पार करेल, असंही नासाने म्हटलं आहे.

कॅलिफोर्नियातील नासाच्या जेट प्रोपल्शन लॅबरोटरीतील रडार शास्रज्ञ मरिना ब्रोझोविक या नियर अर्थ ऑबजेक्ट्सची (NEO’s) रडारद्वारे निरीक्षणं करतात. त्या म्हणाल्या,‘2029 मध्ये अपोफिस पृथ्वीच्या इतक्या जवळून जाणार आहे ही विज्ञानासाठी पर्वणी आहे. आणखी महत्त्वाचं म्हणजे ऑप्टिकल आणि रडार टेलिस्कोप अशा दोन्ही पद्धतींनी शास्रज्ञांना या लघुग्रहाचा अभ्यास करता येणार आहे.’

First published:

Tags: Aeronautics, Apophis, Asteroid, Nasa, Science, Space