अहमदाबाद, 12 सप्टेंबर : गुजरातमध्ये पावसाने (Gujrat rain) कहर माजवला आहे. हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार राज्यामध्ये मुसळधार पाऊस कोसळला आहे. रस्त्यांवर नदीनाल्यांप्रमाणे पाणी वाहू लागलं आहे आणि पावसाने कसा हाहाकार माजवला आहे त्याची दृश्यं आता समोर आली आहेत.
धो-धो कोसळणाऱ्या पावसामुळे रस्त्यांना नद्यांचं रूप आलं. साबरकांठा जिल्ह्यातील ईडरमधील हा व्हिडीओ आहे. फक्त एका तासातच इतका पाऊस पडला की, रस्ते पाण्याने भरले. पुराच्या या पाण्यात रस्त्याशेजारी पार्क केलेली कारही बघता बघता वाहून गेली आहे.
दरम्यान पावसाचा हा जोर आणखीन वाढणार असल्याचं भारतीय हवामान विभागाने सांगितलं आहे. आयएमडीने महाराष्ट्र, गुजरात, आंध्र प्रदेश, ओडिशा, तेलंगणा इथं आणखी मुसळधार पाऊस कोसळणार असल्याचा अंदाज वर्तवला आहे.
Heavy rain at isolated places very likely over sub-Himalayan West Bengal, Sikkim & northeast India during next 3-4 days. Rainfall distribution & intensity very likely to increase over Odisha, coastal Andhra Pradesh, Yanam, Telangana, Maharashtra & Gujarat from 12 Sept onward: IMD https://t.co/YwxwRdHbaz
पुढील पाच दिवस भारतीय समुद्रकिनाऱ्यावर अशाच पावसाचा इशारा IMD ने दिला आहे. पुढील पाच दिवस, सागरी किनाऱ्याजवळ ढगांचा गडगडाट आणि विजेच्या कडकडाटासर धुवांधार पाऊस बरसणार असल्याची शक्यता व्यक्त केली आहे. त्यामुळे पाऊस आणखी रौद्र रूप धारण करणार असून नागरिकांना सतर्क राहण्यास सांगण्यात आलं आहे.