मुंबई, 01 ऑक्टोबर: महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Cm Uddhav Thackeray) यांचे पुत्र तेजस ठाकरे (tejas Thackeray) यांनी एक अंध माश्याच्या (new species of balm fish) नव्या प्रजातीचा शोध लावला आहे. तेजस यांनी इंस्टाग्रामवर पोस्ट करुन याबाबतची माहिती दिली आहे. मुंबईतील विहीरींमध्ये 'ईल' माशाची नवी रक्तवर्णीय प्रजाती तेजस ठाकरे यांना आढळून आली.
नवीन प्रजाती एक 'hypogean freshwater eel' आहे. तेजस ठाकरे ,प्रवीणराज जयसीम्हान आणि अनिल मोहोपात्रा यांच्या टीम ने हे संशोधन केले आहे. ही प्रजाती अंध (Blind Eel) असून 'रक्थमिच्थिस मुंबा' (Rakthamichtys Mumba) असे या प्रजातीचं नामकरण केलं आहे.
View this post on Instagram
तेजस ठाकरे यांनी इंस्टाग्रामवर पोस्टमध्ये म्हटलं की, मला असं वाटतं की हा माझा आतापर्यंतचं सर्वोत्तम संशोधन आहे. अंध हायपोजीन गोड्या पाण्याची ईल ती सुद्धा मुंबईत. त्याला रक्थमिच्थिस मुंबा असे नाव देण्यात आलं आहे, जे आमचं शहर मुंबईपासून प्रेरित आहे.
तेजस ठाकरे यांनी त्यांच्या पोस्टमध्ये लिहिलं आहे की, काही वर्षांपूर्वी आम्ही ही नवीन प्रजातीचा शोध घेतला होता. आम्ही कोरोनाच्या काळात त्यावर काम केलं आणि आता आम्ही ते जगासमोर आणलं आहे.
हेही वाचा- Sex करणं पडलं महागात, मद्यधुंद बॉयफ्रेंडनं दाबला गळा; महिलेचा मृत्यू
महाराष्ट्र आणि उत्तर पश्चिम घाटातून वर्णन केलेली ही पहिली पूर्णपणे अंध भूगर्भातील गोड्या पाण्यातील माशांची प्रजाती आहे. आम्ही तुम्हाला सांगू की ही पहिली अंध गोड्या पाण्यातील माशांची प्रजाती आहे, जी पश्चिम भागात आढळली आहे. 'Aqua International Journal of Ichthyology' मध्ये याबाबत एक अभ्यास प्रकाशित झाला आहे. ठाकरे वाईल्ड लाईफ फाउंडेशनने पर आणि शेपूट नसलेल्या एका नव्या दुर्मिळ माश्याची प्रजातीचं संशोधन केलं.
हेही वाचा- हात-पाय तोडले अन् मुंडकं केलं धडावेगळं; मुंबईत तरुणाची निर्घृण हत्या
तेजस ठाकरे यांनी घोषित केलं की, मुंबा' या प्रजातीचे नाव मुंबई शहराचे अस्तित्व सूचित करते. 'मुंबा' या शब्दाची मूळ मराठी भाषेतून आले असून या शहरातील रहिवाशांनी पूजलेली मुंबा आई या देवतेचा सन्मान करते. या शब्दाचा आदर म्हणून या नवीन प्रजातीचे नामकरण मुंबा असं करण्यात आलं.
View this post on Instagram
तेजस ठाकरे यांचे वडील आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे देखील वाइल्डलाइफ फोटोग्राफर आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.