• Home
 • »
 • News
 • »
 • pune
 • »
 • हात-पाय तोडले अन् मुंडकं केलं धडावेगळं; मुंबईत तरुणाची निर्घृण हत्या

हात-पाय तोडले अन् मुंडकं केलं धडावेगळं; मुंबईत तरुणाची निर्घृण हत्या

Brutal Murder in Mumbai: मुंबईतील अ‍ॅण्टॉप हिल परिसरात मुंडकं नसलेला आणि हात पाय तोडून बांधलेल्या अवस्थेत एक मृतदेह (Without head dead body found) सापडला आहे.

 • Share this:
  मुंबई, 01 ऑक्टोबर: मुंबईतील (Mumbai) अ‍ॅण्टॉप हिल परिसरात मुंडकं नसलेला आणि हात पाय तोडून बांधलेल्या अवस्थेत एक मृतदेह (Without head dead body found) सापडला आहे. सहाय्यक पोलीस आयुक्तांचे कार्यालयापासून हाकेच्या अंतरावर घडलेल्या या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. संबंधित मृतदेह नेमका कोणाचा याबाबत कोणतीही माहिती अद्याप पोलिसांना मिळाली नाही. पोलिसांनी संबंधित मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला असून मृताची ओळख पटवण्याचं काम सुरू केलं आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत. संबंधित मृतदेह 30 ते 35 वयोगटातील व्यक्तीचा असल्याचा अंदाज पोलिसांकडून व्यक्त करण्यात आला आहे. संबंधित मृतदेह अ‍ॅण्टॉप हिल परिसरातील सेक्टर 7 मधील 98 क्रमांकाच्या इमारतीच्या भींतीला लागून असलेल्या एका झुडुपात आढळला आहे. या मृतदेहाची अवस्था पाहून पोलिसांच्याही पायाखालची जमीन सरकली आहे. अज्ञात आरोपीनं अत्यंत निर्घृण संबंधित व्यक्तीची हत्या (Brutal murder) केली असावी, असा संशय पोलिसांकडून व्यक्त करण्यात आला आहे. हेही वाचा-व्यायाम करताना घडलं भलतंच; सांगलीत बड्या डॉक्टरचा जिममध्येच मृत्यू विशेष म्हणजे संबंधित ठिकाण सहाय्यक पोलीस आयुक्तांच्या कार्यालयापासून हाकेच्या अंतरावर आहे. रात्री उशीरा अज्ञात आरोपीनं संबंधित व्यक्तीची हत्या केली असावी, असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. त्यानंतर आरोपीनं अत्यंत निर्दयीपणे मृतदेहाचे हात-पाय तोडून मुंडकं धडावेगळं केलं असावं. यानंतर आरोपीनं संबंधित मृतदेह एकत्रित बांधून याठिकाणी आणून टाकला असावा. हेही वाचा- जिवंत राहण्यापेक्षा तू मेलेला परवडशील! निर्दयी पित्याने पोटच्या लेकराला पंचगंगा नदीत फेकलं आरोपीनं संबंधित मृतदेह जाळण्याचा प्रयत्न केल्याचा संशय देखील पोलिसांना आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आरोपीचा शोध घेतला जात आहे. तसेच मृताची ओळख पटवण्याचं काम सुरू आहे. त्याचबरोबर घटनास्थळापासून आसपासच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे काही संशयास्पद आढळतंय का? याचा तपासही पोलीस करत आहेत.
  Published by:News18 Desk
  First published: