मराठी बातम्या /बातम्या /विदेश /

मद्यधुंद बॉयफ्रेंडसोबत Sex करणं महिलेच्या जीवावर, गळा दाबून केली हत्या

मद्यधुंद बॉयफ्रेंडसोबत Sex करणं महिलेच्या जीवावर, गळा दाबून केली हत्या

आपल्या बॉयफ्रेंडशी शरीरसंबंध (sex) ठेवणं एका महिलेच्या जीवावर बेतलं आहे.

आपल्या बॉयफ्रेंडशी शरीरसंबंध (sex) ठेवणं एका महिलेच्या जीवावर बेतलं आहे.

आपल्या बॉयफ्रेंडशी शरीरसंबंध (sex) ठेवणं एका महिलेच्या जीवावर बेतलं आहे.

इंग्लंड, 01 ऑक्टोबर:  इंग्लंडमधल्या (England) डार्लिंग्टन (Darlington) येथील एक धक्कादायक प्रकरण समोर आलं आहे. आपल्या बॉयफ्रेंडशी शरीरसंबंध (sex) ठेवणं एका महिलेच्या जीवावर बेतलं आहे. मद्यधुंद अवस्थेत असलेल्या बॉयफ्रेंडने ( boyfriend) संभोग करताना गर्लफ्रेंडचा गळा दाबला. यामध्ये तिचा मृत्यू (died) झाला. या प्रकरणी तिथल्या टीसाइड क्राउन कोर्टाने ( Teaside Crown Court) आरोपीला पाच वर्षांपेक्षा कमी शिक्षा सुनावली आहे; मात्र या शिक्षेवर अॅटर्नी जनरल यांनी प्रश्न उपस्थित केला. अॅटर्नी जनरल (Attorney General) यांच्या हस्तक्षेपानंतर आता आरोपीची शिक्षा वाढवली जाऊ शकते.

न्यायाधीश पॉल वॉटसन क्यूसी यांनी गेल्या महिन्यात पायबसला 4 वर्षं 8 महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली. यानंतर महिला हक्क कार्यकर्त्यानेही शिक्षेला आक्षेप घेतला. एखाद्या महिलेचा गळा दाबणं याकडे एक भयंकर हिंसा म्हणून पाहिलं जात नाही, याबाबत त्यांनी खेद व्यक्त केला.

हेही वाचा- आमचे दात येत नाहीयेत, काहीतरी करा म्हणणाऱ्या चिमुकल्यांच्या पत्राला मुख्यमंत्र्यांचं उत्तर आलं; म्हणाले..

 डार्लिंग्टनमधल्या 32 वर्षांच्या सॅम पायबस (Sam Pybus) याला गेल्या महिन्यात टीसाइड क्राउन कोर्टाने त्याची गर्लफ्रेंड सोफी मॉसच्या (Sophie Moss) हत्येसाठी 4 वर्षं 8 महिन्यांची शिक्षा सुनावली होती. पायबस विवाहित आहे. 33 वर्षीय सोफी दोन मुलांची आई होती. आरोपीला कमी शिक्षा सुनावल्याने अॅटर्नी जनरल यांनी हस्तक्षेप केला आहे. गर्लफ्रेंडच्या मृत्यूच्या प्रकरणात आरोपीला दिलेल्या शिक्षेचं वर्णन अॅटर्नी जनरल यांनी 'अनावश्यक उदारपणा' असं केलं आहे. त्यांनी या प्रकरणी न्यायालयात अपील केलं आहे. अॅटर्नी जनरलच्या कार्यालयाच्या प्रवक्त्याने याला दुजोरा दिला आहे. त्यानंतर आता दोषीची शिक्षा वाढवण्याची चर्चा आहे. याबाबतचं वृत्त ‘झी न्यूज’ने दिलं आहे.

टीसाइड क्राउन कोर्टात सुनावणीदरम्यान सांगण्यात आलं, की सॅम पायबसने सोफी मॉससोबत त्याच्या डार्लिंग्टनमधल्या फ्लॅटमध्ये फेब्रुवारीमध्ये शारीरिक संबंध ठेवले. त्या वेळी त्याने बिअरच्या 24 बाटल्या प्यायला होता. मद्यधुंद अवस्थेत शरीरसंबंध ठेवताना त्याने गर्लफ्रेंडच्या गळ्यावर दाब दिला. गळ्यावर दाब पडल्याने तिचा मृत्यू झाला.

हेही वाचा- हाईटच झाली राव! इतकी दारू प्यायला की नशेत हरवला आणि पोलिसांना घेऊन स्वतःलाच शोधायला निघाला

 आपण खूप नशेमध्ये होतो. त्यामुळे घटनेच्या दिवशी काय घडलं हे आठवत नाही, असं सॅम पायबसने तपास अधिकाऱ्यांना सांगितलं आहे. त्याने सांगितलं, की 'जेव्हा मी दुसऱ्या दिवशी सकाळी उठलो तेव्हा सोफी नग्न दिसली आणि ती प्रतिसाद देत नव्हती.' दरम्यान, पायबसने मदतीसाठी आपत्कालीन क्रमांकावर फोन केला नाही आणि डार्लिंग्टन पोलीस स्टेशनमध्ये आत्मसमर्पण करण्यापूर्वी काय करावं या विचारात त्याने 15 मिनिटं त्याच्या कारमध्ये घालवली, असं या प्रकरणाच्या तपास अहवालात नमूद करण्यात आलं आहे.

सोफी मॉसचा गळा दाबून मृत्यू झाल्याचं शवविच्छेदनात उघड झालं आहे. जबरदस्तीने गळा दाबल्याने सोफीचा मृत्यू झाला. सोफीच्या शरीरावर इतर कोणत्याही हिंसाचाराच्या किंवा दुखापतीच्या खुणा नाहीत, असं शवविच्छेदन करणाऱ्या डॉक्टरनी सांगितलं.

First published:

Tags: England