मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /

माथेफिरू जावयाने गाठला क्रूरतेचा कळस! सासरच्या मंडळींना जिवंत जाळलं

माथेफिरू जावयाने गाठला क्रूरतेचा कळस! सासरच्या मंडळींना जिवंत जाळलं

 किरकोळ भांडणाचा राग डोक्यात ठेऊन जावयानं (Son in law)  सासरच्या मंडळींना पेटवून (Burned alive) दिल्याची घटना उघड झाली आहे.

किरकोळ भांडणाचा राग डोक्यात ठेऊन जावयानं (Son in law) सासरच्या मंडळींना पेटवून (Burned alive) दिल्याची घटना उघड झाली आहे.

किरकोळ भांडणाचा राग डोक्यात ठेऊन जावयानं (Son in law) सासरच्या मंडळींना पेटवून (Burned alive) दिल्याची घटना उघड झाली आहे.

  • Published by:  desk news

पटना, 3 सप्टेंबर : किरकोळ भांडणाचा राग डोक्यात ठेऊन जावयानं (Son in law)  सासरच्या मंडळींना पेटवून (Burned alive) दिल्याची घटना उघड झाली आहे. काही दिवसांपूर्वी सासूरवाडीतील मंडळींशी झालेल्या भांडणानंतर (Fight) जावयाने सर्वांना मारून टाकण्याची धमकी (Threat) दिली होती. या धमकीनंतर सासरच्या मंडळींनी पोलिसांना याची कल्पनाही दिली होती. मात्र पोलिसांनी त्याकडे दुर्लक्ष केले आणि जावयानेच आपला शब्द खरा करून दाखवला, अशी चर्चा गावात सुरू आहे.

असे पेटवले घर

ही घटना आहे बिहारच्या बरहट गावातील. सासरच्या मंडळींसोबत झालेल्या वादानंतर जावयाने घराला आग लावून सर्वांचा बदला घेतला. जावई माथेफिरू आणि गरम डोक्याचा असल्याची कल्पना सर्वांना होती, मात्र तो या थऱाला जाईल, असे कुणालाही वाटले नव्हते. घरात सासू, सासरे, मेहुणा आणि मेहुणी असतानाच त्याने घराला कुलूप लावून आग लावली. एका कापडाच्या मदतीने त्याने आग पेटवली आणि सासरच्या मंडळींना एका खोलीत कोंडून पेटवून दिले.

या घटनेत सासू बीबी मरजिना आणि मेहुणा अबुजर यांचा मृत्यू झाला आहे. तर सासरे मो. इशराद आणि मेहुणी शाईस्ता हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. सासरच्या मंडळींना जिवंतपणी पेटवून दिल्यानंतर जावाई मोसम्मिन फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

हे वाचा - सिम अपडेट करण्यासाठी पुण्यातील महिलेला मोजावे लागले 11 लाख, वाचा नेमकं काय घडलं?

गावकऱ्यांचा मोर्चा

या घटनेनंतर गावकऱ्यांनी स्थानिक पोलीस स्टेशनवर मोर्चा काढत आरोपी मोसम्मिनला अटक करण्याची मागणी केली आहे. गावात यामुळे दहशतीचं वातावरण निर्माण झालं असून पोलिसांच्या कार्यक्षमतेवरही प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. सासरच्या मंडळींनी तक्रार दाखल करूनदेखील पोलिसांनी त्याकडे दुर्लक्ष केल्यानेच कुटुंबातील दोघांचा बळी गेला, तर इतर दोघे मृत्युशी झुंज देत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. पोलिसांनी जावयाविरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला असून त्याचा शोध घेतला जात आहे.

First published:

Tags: Bihar, Crime, Murder