मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

मोठी बातमी, सुबोधकुमार जयस्वाल यांची बदली, महाराष्ट्र पोलीस दलाचे सूत्र कुणाकडे?

मोठी बातमी, सुबोधकुमार जयस्वाल यांची बदली, महाराष्ट्र पोलीस दलाचे सूत्र कुणाकडे?

पोलीस दलाच्या पोलीस महासंचालकपदी असलेले सुबोधकुमार जयस्वाल यांच्या नियुक्तीला आज केंद्रीय मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीने हिरवा कंदील दिला आहे.

पोलीस दलाच्या पोलीस महासंचालकपदी असलेले सुबोधकुमार जयस्वाल यांच्या नियुक्तीला आज केंद्रीय मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीने हिरवा कंदील दिला आहे.

पोलीस दलाच्या पोलीस महासंचालकपदी असलेले सुबोधकुमार जयस्वाल यांच्या नियुक्तीला आज केंद्रीय मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीने हिरवा कंदील दिला आहे.

  • Published by:  sachin Salve
मुंबई, 30 डिसेंबर : जुने वर्ष सरत असताना आता राज्याच्या पोलीस दलातही मोठे फेरबदल होण्याची चिन्ह आहे. महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक ( Director General of Police maharashtra ) सुबोधकुमार जयस्वाल (subodh jaiswal) यांची केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या (CISF) महासंचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे राज्याच्या पोलीस महासंचालकपदासाठी अनेक नाव चर्चेत आली आहे. तसंच अनेक वरीष्ठ अधिकाऱ्यांच्या नियुक्तीचा निर्णयही ऐरणीवर आला आहे. महाराष्ट्र पोलीस दलाच्या पोलीस महासंचालकपदी असलेले सुबोधकुमार जयस्वाल यांच्या नियुक्तीला आज केंद्रीय मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीने हिरवा कंदील दिला आहे.  त्यामुळे त्यांच्या जागी आता नवीन महासंचालक कोण येणार याकडे सर्वांचं लक्ष लागले आहे.  नवीन वर्ष सुरू झाल्यावर 2 जानेवारीला नव्या नियुक्तीबाबत चर्चा अपेक्षित आहे.  त्यामुळे पोलीस महासंचालकपदाच्या स्पर्धेत अनेक नावं समोर आली आहे. राज्य होमगार्ड डीजी पांडे हे 2022 ला निवृत्त होत आहेत. तर मुंबई पोलीस आयुक्त परमवीर सिंग हे सुद्धा 2022 मध्ये निवृत्त होणार आहे. त्यामुळे त्यांचे नाव चर्चेत आले आहे.  तर हेमंत नगराळे हे ऑक्टोबर 2022 मध्ये निवृत्त होणार आहे. या तिन्ही अधिकाऱ्यांची नाव महासंचालकपदाच्या शर्यतीत आहे. 'आई वडिलांना मारलं, आता दफन करु द्या,' मुलाची पोलिसांना विनंती - Video त्यांच्यापाठोपाठ बिपीन बिहारी यांचं ही नाव समोर आले आहे. बिपीन बिहारी हे जून 2021 मध्ये निवृत्त होणार आहे. त्यांच्यापाठोपाठ एस एन पांडे हे फेब्रुवारी 2021 म्हणजे दोन महिन्याने निवृत्त होणार आहे. त्यामुळे या दोन्ही अधिकाऱ्यांची नाव आघाडीवर असल्याचे बोलले जात आहे. सुबोधकुमार जयस्वाल यांची केंद्रातील आद्योगित सुरक्षा दलाच्या महासंचालकपदी नियुक्ती झाली आहे. 30 सप्टेंबर 2022 पर्यंत त्यांचा कार्यकाळ असणार आहे. जयस्वाल यांची नियुक्ती झाल्यामुळे महाराष्ट्र पोलीस दलाचा नवीन बॉस कोण होणार अशी चर्चा आता रंगली आहे. पोलिसांसाठी जास्त घरं निर्माण करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश दरम्यान, पोलिसांना निवासस्थाने उपलब्ध व्हावीत यासाठी  महाराष्ट्र पोलीस गृहनिर्माण महामंडळातर्फे मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत सादरीकरण करण्यात आले. मुख्यमंत्र्यांच्या वर्षा शासकीय निवासस्थानी झालेल्या बैठकीस गृह मंत्री अनिल देशमुख, नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे आदी उपस्थित होते. सलमान खाननं चुलीवर बनवलं जेवण, खमंग लसणीचा झणझणीत तडका दिल्याचा पाहा Video या बैठकीत पोलिसांना निवासस्थान बांधून देणाऱ्या खासगी विकासकांना सवलत देणे, पुनर्विकासाच्या प्रस्तावित प्रकल्पातील रहिवासी क्षेत्राच्या आरक्षणात सवलत देऊन निवासस्थानाची उपलब्ध करून घेणे, राज्यातील गृह विभागाच्या जागांचा पोलीस गृहनिर्माण महामंडळाच्या माध्यमातून विकास करणे आणि त्यासाठी महामंडळाला बीज भांडवल उपलब्ध करून देणे अशा विविध पर्यायांबाबत चर्चा करण्यात आली. म्हाडाच्या भुखंडावरील निवासस्थान इमारतींचा पुनर्विकास याबाबतही चर्चा झाली. 'सेवेच्या ठिकाणी चांगले निवासस्थान उपलब्ध झाल्यास पोलीस अधिक कार्यक्षमतेने काम करू शकणार आहेत. त्यासाठी विविध पर्यायांचा अवलंब करून, जास्तीत जास्त संख्येने आणि सुविधांनी युक्त निवासस्थाने बांधण्याची गरज आहे. त्यासाठी सर्वंकष असा प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी  दिले आहे.
First published:

Tags: Maharashtra police, Mumbai police

पुढील बातम्या