सलमान खाननं चुलीवर बनवलं जेवण, खमंग लसणीचा झणझणीत तडका दिल्याचा पाहा Video

सलमान खानचा (Salman Khan) एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर (Social media) प्रचंड व्हायरल (Viral) होत आहे. यामध्ये तो चुलीवर जेवण बनवताना (Cooking Food) दिसत आहे. सलमानचा हा व्हिडिओ अभिनेत्री आणि मानलेली बहीण बीना काक (Bina kak) यांनी फेसबुकवर शेअर केला आहे.

सलमान खानचा (Salman Khan) एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर (Social media) प्रचंड व्हायरल (Viral) होत आहे. यामध्ये तो चुलीवर जेवण बनवताना (Cooking Food) दिसत आहे. सलमानचा हा व्हिडिओ अभिनेत्री आणि मानलेली बहीण बीना काक (Bina kak) यांनी फेसबुकवर शेअर केला आहे.

  • Share this:
    मुंबई, 30 डिसेंबर: बॉलीवूड अभिनेता (Bollywood actor) सलमान खान (Salman khan) आजकाल बिग बॉस 14 (Big Boss 14) मुळे चर्चेत आहे. अलीकडेच सलमान खानने आपला 55 वा वाढदिवस (55th Birthday) साजरा केला आहे. लॉकडाऊनच्या काळात 'दबंग खान' चे अनेक व्हिडिओ (Videos) आपण पाहिले आहेत. त्याला कधी शेती (Farming) करताना, कधी घोडंस्वारी (Horse riding) करताना पाहिलं आहे. पण आताचा हा व्हिडिओ एका कारणामुळे सोशल मीडियावर (Social media) खूप व्हायरल होत आहे. ज्यामध्ये तो चुलीवर जेवण बनवताना दिसत आहे. सलमानचा हा व्हिडिओ अभिनेत्री आणि मानलेली बहीण बीना काक (Bina kak) यांनी शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये दबंग अभिनेता सलमान खान स्टोव्हवर स्वयंपाक करताना दिसत आहे. तर अभिनेत्री बीना काक दबंग खानला स्वयंपाकात मदत करताना दिसत आहे. या व्हिडिओमध्ये सलमान लसूण आणि आल्याचा तडका देताना दिसत आहे. तर बीना काक सलमान खानला कोथिंबीर देताना दिसत आहे. यानंतर तिनं सलमान खानला विचारलं की हे काय आहे? यावर सलमान खान हसून विनोदी उत्तर दिलं आणि म्हणाला, "भुसा आहे भुसा". बीना काकने सलमान खानच्या वाढदिवशी आपल्या फेसबुक अकाऊंटवरुन हा व्हिडिओ  शेअर केला होता. या व्हिडिओला आतापर्यंत चाळीस लाखाहून अधिक लोकांनी पाहिलं आहे. सलमान खानच्या या व्हिडिओवर कमेंट करण्यासाठी चाहत्यांनी मोकार गर्दी केली आहे. सलमान खानचा आगामी चित्रपट 'अंतिम' चा एक व्हिडिओ नुकताच प्रसिद्ध झाला होता. ज्यामध्ये सलमान खान एका शीख कॉपच्या व्यक्तीरेखेत दिसत आहे. याशिवाय सलमान खान लवकरच त्याच्या 'राधेः युवर मोस्ट वॉन्टेड हिरो' या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात मुख्य अभिनेत्रीच्या भूमिकेत दिशा पाटनी आणि रणदीप हूड्डाही आपल्याला या चित्रपटात दिसणार आहे.
    Published by:News18 Desk
    First published: