'माझ्या आई-वडिलांना मारलंत, आता किमान दफन तरी करू द्या', पोलिसांना विनवणी करणाऱ्या मुलाचा VIDEO VIRAL

'माझ्या आई-वडिलांना मारलंत, आता किमान दफन तरी करू द्या', पोलिसांना विनवणी करणाऱ्या मुलाचा VIDEO VIRAL

केरळमधील (Kerala) सोशल मीडियावर (Social Media) पोलिसांकडं आर्जव करणाऱ्या मुलाचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल (Viral Video) होत आहे.

  • Share this:

तिरुवनंतरपुरम, 30 डिसेंबर : सकाळपासून सोशल मीडियावर (Social Media) एक VIDEO  फिरत आहे. पोलिसांकडं आर्जव करणाऱ्या मुलाचा हा व्हिडीओ तुम्हीही कदाचित पाहिला असेल. तो चांगलाच व्हायरल (Viral Video) होत आहे. या व्हिडीओमध्ये एक मुलगा त्याच्या वडिलांच्या मृतदेहाचं दफन करण्यासाठी कबर खोदत आहे, पण पोलीस त्याला ते करण्यापासून थांबवत आहेत. तिरुवनंतपुरमच्या नेयतिकनरा भागातील हा व्हिडीओ आहे. या भागातील वादग्रस्त जमीन रिकामी करण्यासाठी गेलेल्या पोलिसांच्या समोर मुलाच्या आई-वडिलांनी आत्महत्या केली होती.

मुलाचा आरोप काय?

“तुम्ही माझ्या आई-वडिलांच्या मृत्यूला जबाबदार आहात. त्यांनी मला याच ठिकाणी दफन करण्यास सांगितलं होतं. आता त्यांना आराम करू द्या. तुम्ही सर्वांनी माझ्या आई-वडिलांना मारलं आहे, आता त्यांचं दफनही करू देत नाहीत,” असा आरोप मुलानं केला आहे. असं व्हिडीओत दिसतं. तर, ‘या प्रकारचं कृत्य हा कोर्टाच्या आदेशाचा अवमान आहे,’ असं उत्तर पोलिसांनी दिलं आहे.

काय आहे प्रकरण?

स्थानिक लोकांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘ या मुलाचे कुटुंब दोन खोलींच्या झोपडीमध्ये राहात होते. ती झोपडी अतिक्रमण झालेल्या जमिनीवर बांधण्यात आली होती. या मुलाचे वडील या प्रकरणात गेल्या पाच वर्षांपासून कोर्टात केस लढत होते. स्थानिक कोर्टानं जून महिन्यात त्यांच्या विरोधात निकाल दिला. कोर्टाच्या आदेशानंतर ही जमीन रिकामी करण्यासाठी पोलीस 22 डिसेंबर रोजी घटनास्थळावर दाखल झाले होते.

मुलाच्या आई-वडिलांनी झोपडी पाडण्याच्या कारवाईला विरोध केला. त्याचबरोबर स्वत:वर केरोसिन टाकून जाळून घेण्याची धमकी दिली. “आपल्या आई-वडिलांनी फक्त धमकी दिली होती, पोलिसांमुळे परिस्थिती आणखी बिघडली,’’ असा आरोप मुलानं केला आहे. यावेळी झालेल्या वादावादीमध्ये त्याच्या पालकांच्या शरिराला आग लागली. या प्रकरणात त्याच्या वडिलांचा रविवारी तर आईचा मंगळवारी मृत्यू झाला आहे.

या प्रकरणात मृत्यू झालेल्या जोडप्याचा मुलगा आणि पोलिसांमध्ये झालेल्या वादाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. केरळमधील काँग्रेस खासदार के. सुरेश (K. Suresh) यांनी तो व्हिडीओ त्यांच्या फेसबुक वॉलवर शेअर केला आहे.

केरळमध्ये पडसाद

संपूर्ण केरळमध्ये या प्रकरणाचे जोरदार पडसाद उमटले आहेत. अतिक्रमण हटाव मोहिमेमध्ये पोलिसांनी केलेल्या कारवाईची चौकशी करण्याची मागणी विरोधी पक्षांनी केली आहे. मानवाधिकार कार्यकर्त्यांनीही या घटनेचा निषेध केला आहे. या प्रकरणाचं गांभीर्य वाढत जात असल्याचं लक्षात येताच केरळचा पोलीस महासंचालकांनी संपूर्ण घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.

Published by: News18 Desk
First published: December 30, 2020, 9:55 PM IST
Tags: kerala

ताज्या बातम्या