मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

सरकारी नोकरीसाठी अर्ज भरणाऱ्या विद्यार्थ्यांना मुख्यमंत्र्यांकडून 'विशेष' गिफ्ट, नोकरीचे दार अजूनही खुले!

सरकारी नोकरीसाठी अर्ज भरणाऱ्या विद्यार्थ्यांना मुख्यमंत्र्यांकडून 'विशेष' गिफ्ट, नोकरीचे दार अजूनही खुले!

 'हनुमान चालीसा तुमच्या घरात नीट म्हणण्याची संस्कृती नसेल किंवा पद्धत नसेल तर या आमच्या घरी या बोलायची असेल तर जरूर बोला

'हनुमान चालीसा तुमच्या घरात नीट म्हणण्याची संस्कृती नसेल किंवा पद्धत नसेल तर या आमच्या घरी या बोलायची असेल तर जरूर बोला

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासकीय सेवेत सरळ सेवेने नियुक्ती संदर्भात 1 मार्च 2020 पासून जाहिराती प्रसिद्ध झाल्या नाहीत.

मुंबई, 17 डिसेंबर :  कोरोनाच्या (corona) दोन वर्षांच्या काळात शासकीय परीक्षा (government job) होऊ शकल्या नाहीत. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांची वयाची मर्यादा ओलांडून गेली आहे. पण, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (cm uddhav thackery) यांनी अशा विद्यार्थ्यांसाठी शासकीय सेवेची दारे उघडे केले आहे. कमाल वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांना एक वेळची विशेष बाब म्हणून स्पर्धा परीक्षांना बसण्यास मान्यता देण्यात आली आहे.  याबद्दलचा जीआर सामान्य प्रशासन विभागाने आज काढला आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासकीय सेवेत सरळ सेवेने नियुक्ती संदर्भात 1 मार्च 2020 पासून जाहिराती प्रसिद्ध झाल्या नाहीत. त्यामुळे या दोन वर्षांच्या कालावधीत, ज्या उमेदवारांनी ओलांडली आहे. अशा उमेदवारांना  ३१ डिसेंबर २०२२ पर्यंत शासकीय सेवेत सरळसेवेने नियुक्ती संदर्भात ज्या जाहिराती प्रसिद्ध होतील, त्या जाहिरांतीसाठी "एक वेळची विशेष बाब" म्हणून परीक्षेस बसण्याची संधी देण्यात येत आहे.

दिल्लीत गुंडाराज!  मोबाईल चोरांनी तरुणीला नेलं फरफटत, CCTV त कैद झाला VIDEO

तसंच, आज जीआर झाला असून 31 डिसेंबरपर्यंत सेवाभरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली तर त्यासाठी कमाल वयोमर्यादा ज्या उमेदवारांनी ओलांडली आहे. अशा उमेदवारांसाठी देखील "एक वेळची विशेष बाब" म्हणून परीक्षेस बसण्याची संधी देण्यात आली आहे.

द्रविड-लक्ष्मणनंतर सचिनही टीम इंडियाशी जोडला जाणार! गांगुलीने दिले संकेत

कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने ज्या प्रकरणी नजीकच्या काळात जाहिराती प्रसिद्ध झाल्या असून जाहिरातींमध्ये नमूद केलेला अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक या शासन निर्णयाच्या दिनांकापूर्वी उलटून गेला आहे. मात्र प्रत्यक्षात परीक्षांचे आयोजन करण्यात आलेले नाही, अशा प्रकरणी देखील कमाल वयोमर्यादा ज्या उमेदवारांनी ओलांडली आहे. अशा उमेदवारांसाठी अर्ज सादर करण्यास्तव महाराष्ट्र लोकसेवा आयोग अथवा संबंधित निवड समितीने "एक वेळची विशेष बाब" म्हणून परवानगी द्यावी. जेणेकरून त्यांना देखील परीक्षेस बसण्याची संधी मिळणार आहे.

First published: