मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

द्रविड-लक्ष्मणनंतर सचिनही टीम इंडियाशी जोडला जाणार! गांगुलीने दिले संकेत

द्रविड-लक्ष्मणनंतर सचिनही टीम इंडियाशी जोडला जाणार! गांगुलीने दिले संकेत

व्हीव्हीएस लक्ष्मणला (VVS Laxman) एनसीएचा (NCA) प्रमुख तर राहुल द्रविडला (Rahul Dravid) टीम इंडियाचा (Team India) मुख्य प्रशिक्षक म्हणून नियुक्त केल्यानंतर आता सचिन तेंडुलकरलाही (Sachin Tendulkar) भारतीय क्रिकेटमध्ये पुनरागमन करू शकतो, असे संकेत सौरव गांगुलीने (Sourav Ganguly) दिले आहेत.

पुढे वाचा ...
  • Published by:  Shreyas

कोलकाता, 17 डिसेंबर : बीसीसीआयने (BCCI) व्हीव्हीएस लक्ष्मणला (VVS Laxman) एनसीएचा (NCA) प्रमुख तर राहुल द्रविडला (Rahul Dravid) टीम इंडियाचा (Team India) मुख्य प्रशिक्षक म्हणून नियुक्त केलं. बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलीने (Sourav Ganguly) या दोघांच्या नियुक्तीमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली, कारण दोघंही सुरुवातीला ही पदं स्वीकारण्यासाठी फारसे इच्छुक नव्हते. गांगुलीच्या या निर्णयानंतर आता भारतीय क्रिकेटमध्ये पुन्हा एकदा दादा युगाचा आरंभ झाला आहे का? असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे. द्रविड आणि लक्ष्मण यांच्यानंतर आता सचिन तेंडुलकरलाही (Sachin Tendulkar) भारतीय क्रिकेटमध्ये पुनरागमन करू शकतो, असे संकेत सौरव गांगुलीने दिले आहेत.

सौरव गांगुली बॅकस्टेज विथ बोरिया या शोमध्ये बोलत होता. 'सचिन तेंडुलकर भारतीय क्रिकेटमध्ये सामील होण्यापेक्षा मोठी कोणतीही बातमी असू शकत नाही. सचिन थोडा वेगळा आहे. त्याला यात सामील व्हायची इच्छा नाही, पण तो कोणत्या ना कोणत्या रुपाने भारतीय क्रिकेटमध्ये सामील होईल, याचा मला विश्वास आहे. यावर स्पष्टपणे काम करण्याची गरज आहे, कारण चारही बाजूला खूप संघर्ष आहे,' असं गांगुली म्हणाला.

'कधी ना कधी सचिनही भारतीय क्रिकेटमध्ये सामील व्हायचा मार्ग शोधेल. तुम्ही चूक किंवा बरोबर, काहीही केलंत तरी वाद हा शब्द खिडकीच्या बाहेरून आत उडी मारून येतो. हितसंबंधांचा मुद्दा खूपवेळा अवास्तविक होतो. खेळामध्ये सर्वोत्तम व्यक्तींना आणण्यासाठी तुम्हाला चांगली पद्धत शोधावी लागेल,' अशी प्रतिक्रिया दादाने दिली.

टीम इंडियाचा हेड कोच व्हायच्या आधी राहुल द्रविड एनसीएचा प्रमुख होता, त्याआधी द्रविडने अंडर-19 टीम आणि भारतीय ए टीमचंही कोचिंग केलं. टी-20 वर्ल्ड कपनंतर रवी शास्त्री यांचा कार्यकाळ संपला, त्यामुळे द्रविडला टीम इंडियाचं प्रमुख प्रशिक्षक करण्यात आलं. द्रविडच्या कोचिंगमध्ये टीम इंडियाने न्यूझीलंडचा टी-20 सीरिजमध्ये 3-0 ने आणि टेस्ट सीरिजमध्ये 1-0 ने पराभव केला.

राहुल द्रविड टीम इंडियाचा प्रशिक्षक झाल्यानंतर एनसीए प्रमुखाची जागा रिक्त होती. या जागेवर लक्ष्मण याची निवड करण्यात आली. 13 डिसेंबरला लक्ष्मणने एनसीए प्रमुखाचा कार्यकाळ स्वीकारला. त्याआधी लक्ष्मण आयपीएलच्या हैदराबाद टीमचा सल्लागार होता. तसंच त्यान बंगालच्या टीमसाठीही सल्लागाराची भूमिका बजावली.

सचिन तेंडुलकर अजूनपर्यंत कुठेही कोचिंग करत नाही. 2014 साली निवृत्तीनंतर सचिन मुंबई इंडियन्सचा आयकॉन झाला. 2021 आयपीएलच्या दुसऱ्या राऊंडआधी सचिनला मेंटर म्हणून नियुक्त करण्यात आलं.

First published: