नवी दिल्ली, 17 डिसेंबर: मोबाईल चोरांनी (China Snatchers) एका तरुणीला तब्बल 150 मीटर फरफटत (Stretched 150 meters) नेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. दिल्लीत (Delhi) पुन्हा एकदा चोरट्यांचा (Thieves) सुळसुळाट वाढत चालल्याचं हे लक्षण असून रस्त्याने एकाकी फिरणाऱ्या महिलांवर चोरट्यांनी हल्ले करण्याच्या घटनांमध्ये वाढ होऊ लागली आहे. रहदारीच्या वेळेतही हे चोरटे डल्ला मारत असून आपला उद्देश साध्य करण्यासाठी एखाद्याच्या जिवावरही ते उठू शकतात, हे नुकत्याच घडलेल्या एका घटनेतून दिसून आलं आहे. चोरट्यांनी खेचली मोबाईल दिल्लीमध्ये रस्त्याने चालत चाललेल्या एका तरुणीची चोरटे मोबाईल खेचत असल्याचं या व्हिडिओत दिसतं. रस्त्यावर राँग साईडने स्कुटी चालवत दोन स्कुटीस्वार येतात. बाजूने चाललेल्या महिलेच्या गळ्यातील मोबाईल खेचून घेतात. महिला त्यापैकी एकाचे जॅकेट पकडून ठेवते. मात्र त्याची पर्वा न करता चोरटे तिला खेचत नेत असल्याचं या व्हिडिओत दिसतं.
#WATCH | A mobile-snatching incident was reported in the Shalimar Bagh area, on December 16, at 1735 hours, where 2 men on a scooty dragged the victim on the road while snatching her phone: Delhi Police
— ANI (@ANI) December 17, 2021
(Source: CCTV Footage) pic.twitter.com/GYZDw6Uj0J
महिलेनं दाखवलं धाडस दिल्लीतील शालीमार बाग परिसरात फोर्टिस हॉस्पिटलमध्ये काम करणारी ही महिला कामावरून घरी परतत होती. चालत घरी जात असताना चोरट्यांनी तिला गाठलं आणि तिची मोबाईल खेचली. या घटनेनंतर 150 मीटरपर्यंत घसरत जाऊन तिने चोरट्यांना पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र यात ती गंभीर जखमी झाली आणि खाली पडली. रस्त्यावरील नागरिकांनी तिला मदत केली आणि हॉस्पिटलमध्ये दाखल केलं हे वाचा- धुळ्यात एसटी कर्मचाऱ्याचा ह्रदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू, कर्मचारी संतापले पोलीस तपास सुरू पोलिसांनी या घटनेचा तपास सुरू केला आहे. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आणि नाकाबंदी करून लवकरच चोरट्यांना गजाआड केलं जाईल, असं आश्वासन पोलिसांनी दिलं आहे.