मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /पुण्यात तब्बल 5 हजार अफगाण विद्यार्थी, आदित्य ठाकरेंसमोर मांडली व्यथा!

पुण्यात तब्बल 5 हजार अफगाण विद्यार्थी, आदित्य ठाकरेंसमोर मांडली व्यथा!

'मुलं अभ्यास करून परत गेले तर त्यांचा जीव धोक्यात आहे. अफगाणिस्तानात वीज पुरवठा बंद झालाय. माझा कुटुंबियांशी गेल्याकाही दिवसांपासून संपर्क झालेला नाही'

'मुलं अभ्यास करून परत गेले तर त्यांचा जीव धोक्यात आहे. अफगाणिस्तानात वीज पुरवठा बंद झालाय. माझा कुटुंबियांशी गेल्याकाही दिवसांपासून संपर्क झालेला नाही'

'मुलं अभ्यास करून परत गेले तर त्यांचा जीव धोक्यात आहे. अफगाणिस्तानात वीज पुरवठा बंद झालाय. माझा कुटुंबियांशी गेल्याकाही दिवसांपासून संपर्क झालेला नाही'

मुंबई, 17 ऑगस्ट : तालिबान्यांनी (Taliban) अफगाणिस्थान (Afghanistan)  ताब्यात घेतल्यानंतर जगभरात खळबळ उडाली आहे. पुण्यात (pune) सुद्धा शिक्षणासाठी आलेल्या 3 हजाराहून अधिक अफगानी विद्यार्थ्यांचा जीव टांगणीला लागला आहे. आज त्यांनी राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे (aditya thackery) यांची भेट घेतली. यावेळी, महाराष्ट्र तुमच्यासोबत आहे, या मुलांना महाराष्ट्रात काही त्रास होणार नाही याची खात्री घेतली जाईल' असं आश्वासन आदित्य ठाकरेंनी दिलं.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात शिकणारे अफगाणिस्थानातील विद्यार्थ्यांनी मुंबईतील सह्याद्री अतिथिगृहात भेट घेतली. पुणे विद्यापीठाअंतर्गत तीन हजारहून अधिक अफगाणी विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. अफगाणिस्थानात तालिबानी राजवट आल्यामुळे या विद्यार्थ्यांचा त्यांच्या नातेवाईकांशी कोणताही संपर्क होत नाहीये. त्यामुळे हे विद्यार्थी भयभीत झालेले आहेत.

चाहत्यांना नाही आवडला अनिल कपूरच्या मुलीचा Bridal Look; पारंपरिक नाही तर...

'या विद्यार्थ्यांना दिलासा देऊन त्यांना परराष्ट्र मंत्रालया मार्फत त्यांच्या नातेवाईकांशी संपर्क करूण दिला जाईल. आणि ज्या विद्यार्थ्यांची शिक्षण फी राहिली असेल, त्या विद्यार्थ्यांना सवलतही दिली जाईल, असं आश्वासन राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे यांनी अफगाणी विद्यार्थ्यांना दिले.

'महाराष्ट्रात या अफगाणी विद्यार्थ्यांना सुरक्षित वातावरणात शिक्षण घेता येईल. मात्र त्यांच्या पालकांना भारतात आणण्याच्या विद्यार्थ्यांच्या मागणीवर आपण परराष्ट्र मंत्रालयाशी बोलून मार्ग काढणार असल्याचं आदित्य ठाकरे यांनी यावेळी  सांगितलंय.

हद्दच झाली! स्वातंत्र्य दिनी सोशल मीडियावर पाकिस्तानी अभिनेत्रीच्या ब्राची चर्चा

'अफगाण विद्यार्थ्यांचे व्हिसा आणि शरणार्थी स्टेटसबाबत काही मागण्या होत्या. त्या आम्ही ऐकून घेतल्या. या मागण्या पुढे केंद्र सरकारकडे पाठवल्या जातील. या मुलांना महाराष्ट्रात काही त्रास होणार नाही याची खात्री घेतली जाईल, असंही आदित्य ठाकरे म्हणाले.

तर,  'आम्ही 5 हजार मुलं शिकत आहोत. आमची कुटुंब अफगाणिस्तानात आहेत. तिथे जे काही घडलं ते दुर्दैवी आहेत. मुलं अभ्यास करून परत गेले तर त्यांचा जीव धोक्यात आहे. अफगाणिस्तानात वीज पुरवठा बंद झालाय. माझा कुटुंबियांशी गेल्याकाही दिवसांपासून संपर्क झालेला नाही. आदित्य ठाकरेंनी आमची मागणी पुढे सांगू असं आश्वासन दिलं आहे. भारतात राहणाऱ्या मुलांकडे पैसे नाहीत. आम्हाला मदत हवी आहे, असं मोहम्मद नावाच्या अफगान विद्यार्थ्यांने व्यथा मांडली.

First published:

Tags: Pune, अफगाणिस्तान