मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /राज्यात कडक निर्बंध लागू, शनिवारी आणि रविवारी कडक लॉकडाऊन

राज्यात कडक निर्बंध लागू, शनिवारी आणि रविवारी कडक लॉकडाऊन

 राज्यात सर्वत्र रात्री 8 ते सकाळी 7 वाजेपर्यंत रात्रीची संचारबंदी लागू करण्यात आली आहे.

राज्यात सर्वत्र रात्री 8 ते सकाळी 7 वाजेपर्यंत रात्रीची संचारबंदी लागू करण्यात आली आहे.

राज्यात सर्वत्र रात्री 8 ते सकाळी 7 वाजेपर्यंत रात्रीची संचारबंदी लागू करण्यात आली आहे.

मुंबई, 04 एप्रिल : राज्यात कोरोनाचा (Coronavirus) संसर्ग वाढत असल्यामुळे लॉकडाऊन (maharashtra lockdown ) ऐवजी कडक निर्बंध लागू करण्यात आले आहे.  शुक्रवारी संध्याकाळी 8 वाजेपासून महाराष्ट्रात शनिवार व रविवार लॉकडाउन असणार आहे.

राज्य कॅबिनेट मंत्रिमंडळाची बैठकीत लॉकडाऊन लागू करण्याबाबत चर्चा झाली. या बैठकीमध्ये कडक निर्बंध लावावे का असा मुद्दा कॅबिनेट मंत्र्यांनी उपस्थितीत केला होता. अखेर यावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. राज्यात कडक निर्बंध लागू करण्यात आले आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीत याबद्दल सर्वच मंत्र्यांनी लॉकडाऊन न लागू करण्याचा सूर लगावला होता  त्यामुळे उद्या मध्यरात्रीपासून कडक निर्बंधाची अंमलबजावणी केली जाणार आहे.

लशीचे दोन्ही डोस घेतल्यांनंतरही औरंगाबाद मनपाचे प्रशासक Covid -19 पॉझिटिव्ह

औरंगाबाद शहरात शुक्रवारी रात्री ते सोमवार सकाळपर्यंत पूर्णपणे संचारबंदी लागू असते. त्याच धर्तीवर राज्यात लॉकडाऊन केला जात आहे. त्यामुळे राज्यात शनिवारी आणि रविवारी कडक लॉकडाऊन असणार आहे. रात्री 8 ते सकाळी 7 वाजेपर्यंत कडक संचारबंदी असणार आहे.

- रात्री 8 ते 7 या वेळेत नाईट कर्फ्यू लावला जाईल.

- केवळ आवश्यक सेवांना परवानगी असेल.

- रेस्टॉरंट्सना फक्त टेक टू आणि पार्सल सेवांसाठी परवानगी आहे.

- कार्यालयांसाठी कर्मचार्‍यांना घरून काम करावे लागेल.

- रात्रीच्या निर्बंधा दरम्यान, केवळ आवश्यक सेवांना परवानगी असेल

- नाट्यगृहे, उद्याने, क्रीडांगणे बंद राहतील

- शासकीय कार्यालये 50% क्षमतेने कार्य करतील

- बांधकाम, औद्योगिक क्रियाकलाप आणि बाजारपेठा कार्य करण्यास अनुमती दिली जाईल

राज्यात कडक निर्बंध, काय बंद राहणार?

- 30 एप्रिलपर्यंत कडक निर्बंध

- बार, हॉटेल, मॉल्स बंद राहणार

- नाट्यगृह, सिनेमागृह बंद

- अत्यावश्यक सेवा सोडून रात्री 8 ते सकाळी 6 पर्यंत सगळं बंद

- शुक्रवारी रात्री 8 ते सोमवारी सकाळी 7 पर्यंत राज्यात संपूर्ण लॉकडाउन

- लोकलमध्ये आसनक्षमतेनुसार प्रवास करता येणार

- रिक्षामध्ये फक्त दोन प्रवाशांना परवानगी

- बसमध्ये आसनक्षमतेनुसार प्रवाशांना परवानगी

- राजकीय, धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमांना बंदी

- मास्क न घातल्यास 500 रुपये दंड

- होम डिलिव्हरी सुरू राहणार

- शासकीय कार्यालयं 50 टक्के क्षमतेनं सुरू राहणार

- धार्मिक स्थळावर देखील काही बंधन

- गृहनिर्माण क्षेत्रातील सर्व कामं सुरू राहणार

First published:

Tags: Lockdown, Mumbai