मराठी बातम्या /बातम्या /aurangabad /लशीचे दोन्ही डोस घेतल्यांनंतरही औरंगाबाद मनपाचे प्रशासक Covid -19 पॉझिटिव्ह

लशीचे दोन्ही डोस घेतल्यांनंतरही औरंगाबाद मनपाचे प्रशासक Covid -19 पॉझिटिव्ह

औरंगाबाद महापालिकेचा गाडा हाकणारे प्रशासक आस्तिक कुमार पांडेय यांना कोरोनाची लागण झाली आहे. काहीसा त्रास होत असल्यामुळं पांडेय यांनी शनिवारी कोरोनाची RTPCR चाचणी केली होती.

औरंगाबाद, 04 एप्रिल : औरंगाबाद महापालिकेचा गाडा हाकणारे प्रशासक आस्तिक कुमार पांडेय यांना कोरोनाची लागण झाली आहे. काहीसा त्रास होत असल्यामुळं पांडेय यांनी शनिवारी कोरोनाची RTPCR चाचणी केली होती. रविवारी सकाळी आलेल्या रिपोर्ट्समध्ये त्यांना कोरोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झालं आहे.

वाचा - 'मे' अखेरपर्यंत कोरोनाची स्थिती भयावह! संशोधनातून समोर आलं किती असेल रुग्णसंख्या

औरंगाबादमध्ये कोरोनाची स्थिती अत्यंत गंभीर आहे. रोज कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. मनपा बरखास्त झाल्यामुळं शहराचा कारभार प्रशासक म्हणून आस्तिक कुमार पांडेय हे चालवत होते. मात्र आता त्यांनाच कोरोना झाल्याने, शहरातील परिस्थितीबाबत आता चिंता व्यक्त केली जात आहे. गेल्या काही दिवसांत औरंगादमधील आरोग्य वैद्यकीय अधिकाऱ्यांसह काही प्रमुख अधिकाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याचं पाहायला मिळालं. त्यात आता पांडेय यांनाही लागण झाल्यानं, काहीसं काळजीचं वातावरण निर्माण झालं आहे.

वाचा - आरोग्य कर्मचारी आता नाही घेऊ शकणार कोरोना लस! CoWin अ‍ॅपवरील रजिस्ट्रेशन बंद

लसीचे दोन्ही डोस घेतले

आस्तिक कुमार पांडेय यांनी कोरोनावरील प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस घेतले होते. दोन्ही डोस घेतल्यानंतरही त्यांना कोरोनाची लागण झाल्यामुळं आश्चर्य व्यक्त केले जात आहे. तसंच औरंगाबाद मनपाच्या कामकाजावर यामुळं आणखी परिणाम होणार का असा सवालही उपस्थित केला जात आहे.

First published:

Tags: Aurangabad, Corona