मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

ST employees strike: ST महामंडळाचं खासगीकरण होणार?

ST employees strike: ST महामंडळाचं खासगीकरण होणार?

बसवरील सीटवर बसले असताना अचानक त्याना आकडी आली व  ते बेशुद्ध झाले.

बसवरील सीटवर बसले असताना अचानक त्याना आकडी आली व ते बेशुद्ध झाले.

ST strike updates: एसटी महामंडळाचे कर्मचारी संपावर असताना आता एक मोठी बातमी समोर आली आहे.

मुंबई, 19 नोव्हेंबर : राज्य परिवहन अर्थात एसटी कर्मचाऱ्यांचा संप (ST employees strike) अद्यापही सुरूच आहे. एसटी महामंडळाचं (ST Mahamandal) राज्य शासनात (Maharashtra Government) विलिगीकरण करण्याच्या मागणीवर कर्मचारी ठाम आहेत. त्याच दरम्यान आता एसटी महामडंळाचं राज्य शासनात विलिगीकरण करण्याऐवजी चक्क खासगीकरण करण्यात येणार असल्याची चाचपणी सुरू असल्याची माहिती समोर येत आहे.

एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावर तोडगा काढण्याच्या संदर्भात काल एसटी महामंडलाची एक बैठक पार पडली. या बैठकीत एसटी महामंडळाच्या खासगीकरणाचा पर्याय ठेवण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. गेले दोन आठवडे विलिगीकरणाच्या मागणीसाठी संपावर असलेले ST कर्मचारी आणि त्यामुळे आधीच तोट्यात गेलेली एसटी आणखीन तोट्यात गेलीय. त्यातच ST च्या विलिगीकरणाची मागणीमुळे एसटी नफ्यात आणायची असेल तर तिचं खासगीकरण करण्याचाच पार्याय आता ST महामंडळाकडे असल्याची सूत्रांनी माहिती दिली आहे.

आता ST महकरामंडळानेही चाचपणी सुरू केल्याची माहीती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे संपावर गेलेल्या ST कर्मचाऱ्यांवर आता वेगळ्याच संकटाची तलवार लटकू लागली आहे. या सर्व साठमारीत आता ST कर्मचारी कोणता निर्णय घेतायेत याकडे लक्ष लागलं आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, एसटी महामंडळाचं टप्प्याटप्प्याने खासगीकरण करण्याचा विचार सुरू आहे. त्यानुसार, सुरुवातीला पहिल्या टप्प्यात लांब पल्ल्याचे मार्ग खासगी वाहतूक कंत्राटदारांसाठी खुले करून देण्याचा पर्याय तपासून पाहिला जाऊ शकतो. आता यावर काय निर्णय होतो हे पहावं लागले.

वाचा : बुलढाण्यातील संपकरी एसटी कर्मचारी विशाल अंबलकर यांचा अखेर मृत्यू

खासगीकरण झाल्यास सध्या लागू असलेले तिकीट दर आहे तेच ठेवण्यात येतील म्हणजेच तिकीट दरात सध्या कुठलीही वाढ होणार नसल्याची माहिती समोर आली आहे. शिवशाही आणि शिवनेरी गाड्या चालवणाऱ्या कंपन्यांनाच खासगीकरणात प्राधान्य देण्याचा विचार असल्याचं बोललं जात आहे.

एसटी ही गरिबांची जीवनवाहिनी आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या बाबतीत जसं सरकारचं धोरण आहे त्याच प्रमाणे नागरिकांच्या बाबतीतही... त्यांना पर्यायी व्यवस्था करुन देणं सरकारचं काम आहे. त्यामुळे जर कामगार आपल्या मागणीवर अडून बसले तर सरकारला वेगवेगळ्या पर्यायांचा विचार केलाच पाहिजे आणि त्याबद्दलची प्रक्रिया सुरू झाली आहे अशी प्रतिक्रिया राज्याचे परिहवन मंत्री अनिल परब यांनी दिली आहे.

वाचा : संपकरी एसटी कर्मचाऱ्याला हृदयविकाराचा झटका, सांगलीतील राहत्या घरी निधन

चित्रा वाघ यांचं उपमुख्यमंत्री अजित पवारांना पत्र

आपल्या मागण्या जोपर्यंत पूर्ण होत नाहीत तोपर्यंत संप मागे न घेण्यावर एसटी कर्मचारी ठाम आहेत. संपावर तोडगा निघत नसताना परिवहन महामंडळाकडून संपकरी कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात येत आहे. याच दरम्यान आता भाजपच्या प्रदेश उपाध्यक्ष चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार (Dycm Ajit Pawar) यांना पत्र लिहून एक विनंती केली आहे.

पत्रास कारण की... एसटी कर्मचाऱ्यांचे आत्महत्या सत्र थांबवण्यास पुढाकार घ्यावा.. त्यांच्या मुलांच्या भवितव्याचा विचार करून राज्य परिवहन महामंडळाचे शासनात विलिनीकरण या मुख्य मागणीवर त्वरीत तोडगा काढावा अशी मागणी चित्रा वाघ यांनी पत्राच्या माध्यमातून केली आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांना लिहिलेल्या पत्रात चित्रा वाघ यांनी म्हटलं, "आपल्याला माहित आहे की, गेले 5 दिवस एसटी कर्मचाऱ्यांचे आपल्या मागण्यांसाठी राज्यभरात आंदोलन सुरू आहे. पण या आंदोलनाची सरकार दरबारी योग्य ती दखल घेतली जात नाहीये. त्यामुळे आंदोलन तीव्र होत चालले आहे. इच्छा असेल तर मार्ग निघतोच पण शिवसेनेचे मंत्री अनिल परब आडमुठेपणा करत व्हिलनच्या भूमिकेत जात आहेत."

आपल्या पत्रात त्यांनी पुढे म्हटलं, "दादा, आपण आत्तापर्यंत ज्या विषयात लक्ष घातलं तो यशस्वीपणे तडीस नेला आहे. त्यामुळे आत्त्ही आपण या प्रकऱणात लक्ष घातलं तर तो सकारात्मकपणे निकाली निघेल याची मला खात्री वाटते. अजून कोणत्या कर्मचाऱ्याने आत्महत्याचे पाऊल उचलण्यापूर्वीच त्यांची मुख्य मागणी एसटी महामंडळाचे शासनात विलीनीकरण व्हावे याची आपण त्वरीत दखल घ्यावी ही अपेक्षा."

First published:

Tags: St bus, Strike, महाराष्ट्र