मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

ST Employees Strike: 'एसटी कर्मचाऱ्यांचे आत्महत्या थांबवण्यास पुढाकार घ्या' चित्रा वाघ यांचं उपमुख्यमंत्री अजित पवारांना पत्र

ST Employees Strike: 'एसटी कर्मचाऱ्यांचे आत्महत्या थांबवण्यास पुढाकार घ्या' चित्रा वाघ यांचं उपमुख्यमंत्री अजित पवारांना पत्र

अन् राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी दिलेल्या चित्रा वाघ यांनी लिहिलं अजित पवारांना पत्र, म्हणाल्या...

अन् राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी दिलेल्या चित्रा वाघ यांनी लिहिलं अजित पवारांना पत्र, म्हणाल्या...

Chitra Wagh writes letter to Ajit Pawar: भाजपच्या प्रदेश उपाध्यक्ष चित्रा वाघ यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांना पत्र लिहिलं आहे.

मुंबई, 16 नोव्हेंबर : राज्य परिवहन महामंडळ अर्थात एसटीच्या कर्मचाऱ्यांचा संप (ST Employees Strike) आजही सुरुच आहे. आपल्या मागण्या जोपर्यंत पूर्ण होत नाहीत तोपर्यंत संप मागे न घेण्यावर एसटी कर्मचारी ठाम आहेत. संपावर तोडगा निघत नसताना परिवहन महामंडळाकडून संपकरी कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात येत आहे. याच दरम्यान आता भाजपच्या प्रदेश उपाध्यक्ष चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार (Dycm Ajit Pawar) यांना पत्र लिहून एक विनंती केली आहे. (Chitra Wagh letter to Ajit Pawar over st employees stike)

पत्रास कारण की... एसटी कर्मचाऱ्यांचे आत्महत्या सत्र थांबवण्यास पुढाकार घ्यावा.. त्यांच्या मुलांच्या भवितव्याचा विचार करून राज्य परिवहन महामंडळाचे शासनात विलिनीकरण या मुख्य मागणीवर त्वरीत तोडगा काढावा अशी मागणी चित्रा वाघ यांनी पत्राच्या माध्यमातून केली आहे.

चित्रा वाघ यांच्या पत्रात नेमकं काय?

उपमुख्यमंत्री अजित पवार यांना लिहिलेल्या पत्रात चित्रा वाघ यांनी म्हटलं, "आपल्याला माहित आहे की, गेले 5 दिवस एसटी कर्मचाऱ्यांचे आपल्या मागण्यांसाठी राज्यभरात आंदोलन सुरू आहे. पण या आंदोलनाची सरकार दरबारी योग्य ती दखल घेतली जात नाहीये. त्यामुळे आंदोलन तीव्र होत चालले आहे. इच्छा असेल तर मार्ग निघतोच पण शिवसेनेचे मंत्री अनिल परब आडमुठेपणा करत व्हिलनच्या भूमिकेत जात आहेत."

"एसटी विलिनीकऱणाचा मुद्दा काढला की बॅलन्सशीट पुढे केली जातेय. सुमारे 35 पेक्षा जास्त एसटी कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केलीय. त्यांची मुलं पोरकी झालीत. पत्नी विधवा झाल्या आहेत. ही जीवितहानी कशी भरुन येणार...? माणसाच्या जीवाची किंमत बॅलन्सशीटवर ठरवली जाणार का...? आयुष्याच्या बॅलन्सशीटमध्ये जगणं महाग आणि मरण स्वस्त झालंय."

आपल्या पत्रात त्यांनी पुढे म्हटलं, "दादा, आपण आत्तापर्यंत ज्या विषयात लक्ष घातलं तो यशस्वीपणे तडीस नेला आहे. त्यामुळे आत्त्ही आपण या प्रकऱणात लक्ष घातलं तर तो सकारात्मकपणे निकाली निघेल याची मला खात्री वाटते. अजून कोणत्या कर्मचाऱ्याने आत्महत्याचे पाऊल उचलण्यापूर्वीच त्यांची मुख्य मागणी एसटी महामंडळाचे शासनात विलीनीकरण व्हावे याची आपण त्वरीत दखल घ्यावी ही अपेक्षा."

वाचा : 'ज्यांना कामावर जायचे जाऊ द्या, वैयक्तिक घोषणा देऊ नका', कोर्टाने ST संघटनेला फटकारले

संपकरी एसटी कर्मचाऱ्यांना मुख्यमंत्र्यांचे कळकळीचे आवाहन

संपकरी एसटी कर्मचाऱ्यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कळकळीचे आवाहन करत आंदोलन मागे घ्या आणि सहकार्य करण्याचं म्हटलं आहे. एसटी कर्मचाऱ्यांना चिथावणी देऊन राजकीय पोळ्या भाजू नका असंही विरोधकांना म्हटलं आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हटलं, एसटी कर्मचाऱ्यांनो तुम्ही आमचेच आहात, बाहेरचे नाहीत. गेल्या काही दिवसांपासून तुमच्या मागण्या मान्य करून तुम्हाला दिलासा द्यावा यासाठी, राज्य शासन मनापासून प्रयत्न करीत आहे. उच्च न्यायालयासमोर देखील शासनाने आपला प्रश्न सोडविण्यासाठी काय काय पाऊले उचलत आहोत ते सांगितले असून न्यायालयाचे देखील समाधान झाले आहे. न्यायालयाच्या सूचनेप्रमाणे आपल्या मागण्यांसंदर्भात पुढील तोडगा काढण्यासाठी आपण विशेष समिती नेमून कामही सुरू केलं आहे.

मुख्यमंत्र्यांनी पुढे म्हटलं, अशा परिस्थितीत माझी आपणास हात जोडून विनंती आहे की, कृपया राज्यातील गोरगरीब आणि सर्वसामान्य प्रवाशांना वेठीस धरणारे आंदोलन करू नका. आधीच आपण सर्वच जण अजूनही कोरोनाशी लढतोय. दोन वर्षांपासून या विषाणूचा मुकाबला करत आपण कसाबसा मार्ग काढतोय. त्यामुळे कृपया शासनाच्या प्रयत्नांना सहकार्य करा अशी माझी पुन्हा एकदा नम्र विनंती आहे.

राजकीय पक्षांनी देखील गरीब एसटी कर्मचाऱ्यांना चिथावणी देऊन, आंदोलनास भाग पाडून त्यांच्या संसारांच्या होळयांवर आपल्या राजकीय पोळ्या भाजू नका अशी माझी त्यांनाही कळकळीची विनंती आहे. ही वेळ राजकारणाची नाही हे लक्षात घ्या असंही मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे.

First published:

Tags: Ajit pawar, Chitra wagh, Strike