मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

ST महामंडळाचं खासगीकरणाचा विचार नाही, तो एक पर्याय आहे : परिवहन मंत्री अनिल परब

ST महामंडळाचं खासगीकरणाचा विचार नाही, तो एक पर्याय आहे : परिवहन मंत्री अनिल परब

Anil Parab on ST privatisation: एसटी महामंडळाचं खासगीकरण होणार की नाही यावर परिवहन मंत्री अनिल परबानी प्रतिक्रिया दिली आहे.

Anil Parab on ST privatisation: एसटी महामंडळाचं खासगीकरण होणार की नाही यावर परिवहन मंत्री अनिल परबानी प्रतिक्रिया दिली आहे.

Anil Parab on ST privatisation: एसटी महामंडळाचं खासगीकरण होणार की नाही यावर परिवहन मंत्री अनिल परबानी प्रतिक्रिया दिली आहे.

मुंबई, 19 नोव्हेंबर : राज्य परिहवन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचा संप (ST employees strike) सुरू असताना एसटीचं खासगीकरण करण्याच्या संदर्भातील वृत्त समोर आलं. एसटी महामंडळाचं खरंच खासगीकरण होणार का? असा प्रश्न सर्वांच्या मनात उपस्थित होत होता. यावर आता राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. एसटी महामंडळाचं खासगीकरण करण्याचा विचार नाहीये मात्र, तेो एक पर्याय आहे असं वक्तव्य अनिल परब यांनी केलं आहे.

एसटी महामडंळाचं राज्य शासनात विलिगीकरण करण्यात यावं अशी मागणी करत एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. या विलिगीकरणाच्या निर्णयावर समितीच निर्णय घेईल असंही अनिल परब यांनी म्हटलं आहे.

त्यांनी पुढे म्हटलं, चर्चा नेमकी कुणाशी करायची? ना एसटी कर्मचारी युनियनचे ऐकतायत ना भाजप नेत्यांचे. आंदोलन नेतृत्वहीन झालंय. कामगारांनी सांगावं कुणाशी बोलावे, त्यांच्याशी बोलायला मी तयार आहे. वेगवेगळ्या राज्यांचा अभ्यास करतोय. तिथली वाहतूक व्यवस्था आणि कर्मचाऱ्यांचे वेतन याचा आढावा घेतला जातोय.

गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत यांच्याशी मी दोनदा बोललो. पण नंतर संपर्क नाही. त्यांनी कामगारांना आझाद मैदानात आणले आहे. त्यापेक्षा चर्चा करा. निर्णय कामगारांनी घ्यायचा आहे. फडणवीस यांनी प्रवाशी कराचा फॉर्म्यूला सांगितला,जो आम्ही गांभीर्याने घेतला आहे. कोरोनापूर्व काळात हा फॉर्म्यूला शक्य होता. आता खूप मोठा गॅप पडलाय. आताही तो करता येईल. त्यासाठी संप मागे घ्यावा लागेल असंही अनिल परब म्हणाले.

वाचा : संपकरी एसटी कर्मचाऱ्याला हृदयविकाराचा झटका, सांगलीतील राहत्या घरी निधन

वेगवेगळ्या पर्यायांचा विचार

एसटी ही गरिबांची जीवनवाहिनी आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या बाबतीत जसं सरकारचं धोरण आहे त्याच प्रमाणे नागरिकांच्या बाबतीतही... त्यांना पर्यायी व्यवस्था करुन देणं सरकारचं काम आहे. त्यामुळे जर कामगार आपल्या मागणीवर अडून बसले तर सरकारला वेगवेगळ्या पर्यायांचा विचार केलाच पाहिजे आणि त्याबद्दलची प्रक्रिया सुरू झाली आहे अशी प्रतिक्रिया राज्याचे परिहवन मंत्री अनिल परब यांनी काल दिली होती.

असं म्हटलं जात होतं की, एसटी महामंडळाचं टप्प्याटप्प्याने खासगीकरण करण्याचा विचार सुरू आहे. त्यानुसार, सुरुवातीला पहिल्या टप्प्यात लांब पल्ल्याचे मार्ग खासगी वाहतूक कंत्राटदारांसाठी खुले करून देण्याचा पर्याय तपासून पाहिला जाऊ शकतो.

चित्रा वाघ यांचं उपमुख्यमंत्री अजित पवारांना पत्र

आपल्या मागण्या जोपर्यंत पूर्ण होत नाहीत तोपर्यंत संप मागे न घेण्यावर एसटी कर्मचारी ठाम आहेत. संपावर तोडगा निघत नसताना परिवहन महामंडळाकडून संपकरी कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात येत आहे. याच दरम्यान आता भाजपच्या प्रदेश उपाध्यक्ष चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार (Dycm Ajit Pawar) यांना पत्र लिहून एक विनंती केली आहे.

पत्रास कारण की... एसटी कर्मचाऱ्यांचे आत्महत्या सत्र थांबवण्यास पुढाकार घ्यावा.. त्यांच्या मुलांच्या भवितव्याचा विचार करून राज्य परिवहन महामंडळाचे शासनात विलिनीकरण या मुख्य मागणीवर त्वरीत तोडगा काढावा अशी मागणी चित्रा वाघ यांनी पत्राच्या माध्यमातून केली आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांना लिहिलेल्या पत्रात चित्रा वाघ यांनी म्हटलं, "आपल्याला माहित आहे की, गेले 5 दिवस एसटी कर्मचाऱ्यांचे आपल्या मागण्यांसाठी राज्यभरात आंदोलन सुरू आहे. पण या आंदोलनाची सरकार दरबारी योग्य ती दखल घेतली जात नाहीये. त्यामुळे आंदोलन तीव्र होत चालले आहे. इच्छा असेल तर मार्ग निघतोच पण शिवसेनेचे मंत्री अनिल परब आडमुठेपणा करत व्हिलनच्या भूमिकेत जात आहेत."

आपल्या पत्रात त्यांनी पुढे म्हटलं, "दादा, आपण आत्तापर्यंत ज्या विषयात लक्ष घातलं तो यशस्वीपणे तडीस नेला आहे. त्यामुळे आत्त्ही आपण या प्रकऱणात लक्ष घातलं तर तो सकारात्मकपणे निकाली निघेल याची मला खात्री वाटते. अजून कोणत्या कर्मचाऱ्याने आत्महत्याचे पाऊल उचलण्यापूर्वीच त्यांची मुख्य मागणी एसटी महामंडळाचे शासनात विलीनीकरण व्हावे याची आपण त्वरीत दखल घ्यावी ही अपेक्षा."

First published:

Tags: Anil parab, St bus, Strike