Home /News /mumbai /

ST Employees Strike: संपकरी एसटी कर्मचाऱ्यांवर कारवाईचा बडगा, आज तिसऱ्या दिवशीही निलंबनाची शक्यता

ST Employees Strike: संपकरी एसटी कर्मचाऱ्यांवर कारवाईचा बडगा, आज तिसऱ्या दिवशीही निलंबनाची शक्यता

ST Employees Strike: राज्यात एसटी कर्मचाऱ्यांचा संप आजही सुरुच असल्याचं पहायला मिळत आहे.

मुंबई, 11 नोव्हेंबर : एसटी कर्मचाऱ्यांचा संप (ST Employees Strike) आजही सुरुच आहे. जोपर्यंत एसटी महामंडळाचे (ST Mahamandal) राज्य शासनात (Maharashtra Government) विलगीकरण होत नाही आणि वेतन वाढ होत नाही तोपर्यंत संप मागे न घेण्यावर एसटी कर्मचारी ठाम आहेत. राज्य शासनाकडून संप मागे घेण्याबाबत वारंवार आवाहन करण्यात येत असतानाही एसटी कर्मचारी संपावर ठाम आहेत. त्यामुळेच गेल्या दोन दिवसांपासून संपकरी कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई सुरू आहे. आता तिसऱ्या दिवशी सुद्धा संपकरी कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आज सलग तिसऱ्या दिवशी आंदोलक एसटी कर्मचाऱ्यांवर कारवाई होणार आहे. जवळपास 300 कर्मचाऱ्यांवर कारवाई होण्याची शक्यता आहे. पहिल्या दिवशी 376 कामगारांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली होती तर दुसऱ्या दिवशी 542 कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली होती. वाचा : आंदोलन करणाऱ्या ST कर्मचाऱ्यांची नोकरी संकटात; महामंडळाकडून कारवाई सुरू राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab) यांनी म्हटलं, मी सतत एसटी कर्मचाऱ्यांना आवाहन करतोय की संप मागे घ्या. कोर्टानं दिलेल्या निर्देशाप्रमाणे कमिटी नेमलीय, कर्मचाऱ्यांची मागणी कमिटीपुढे जाऊन मांडावी लागेल. कमिटी जो अहवाल देईल तो सर्वांना लागू असेल. इन्क्रीमेंटची मागणी वगळता मझ्या अखत्यारितील मागण्या मान्य झाल्या आहेत. कोर्टानं संप बेकायदेशिर ठरवलाय, संप मागे घ्या. काल सदाभाऊ खोतांना मी समजावून सांगितलं, चर्चा झाली पण त्यांनी बाहेर जाऊन भलतंच सांगितलं. दोन्ही विरोधी पक्षनेत्यांशी बोलायला मी केव्हाही तयार आहे. संप सुरुच राहीला, तर एसटीचं मोठं नुकसान होईल. कामगार राजकीय बळी ठरले तर ते दूर्देवी. विलीनीकरणाची मागणी ताबडतोब 2-4 दिवसांत पूर्ण होणार नाही, वेळ लागेल. नेत्यांनी कर्मचाऱ्यांना असेच भडकवले तर नुकसान कर्मचाऱ्यांचेच आहे. विलीनीकरणासंदर्भात आधीच कमिटी नेमलेली आहे, जीआर काढलाय, ही वस्तुस्थिती कर्मचाऱ्यांपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे असंही अनिल परब यांनी म्हटलं. एसटी कर्मचाऱ्यांना राज ठाकरेंचं कळकळीचं आवाहन एसटी कर्मचाऱ्यांनी राज ठाकरेंची भेट घेत आपल्या व्यथा मांडल्या. एसटी कर्मचाऱ्यांनी आत्महत्या करु नये, असं आवाहन राज ठाकरेंनी केलं. राज ठाकरेंनी आत्महत्येच्या घटनांवरुन तीव्र नाराजी व्यक्त केली. जर तुम्ही होणाऱ्या आत्महत्या थांबवल्या तर मी शासन दरबारी शब्द टाकू शकतो त्यामुळे तुम्ही आत्महत्येचं सत्र थांबवा अशी एक अटच संपकरी कर्मचाऱ्यांसमोर ठेवली. यावेळी कामगारांकडून राज ठाकरेंना आश्वासन देण्यात आलं आहे की, यापुढे एकही कामगार आत्महत्या करणार नाही. परंतू ही परिस्थिती म्हणजेच विलगीकरणाचा निर्णय होत नाही तोपर्यंत एक आयोग करावा आणि राज्य सरकारच्या वाहन चालकांना जे वेतन मिळत आहे तेच वेतन एसटीच्या चालकांना आणि वाहकांना मिळावं अशी मागणी केली.
Published by:Sunil Desale
First published:

Tags: Anil parab, ST, Strike

पुढील बातम्या