मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

Big News : आंदोलन करणाऱ्या ST कर्मचाऱ्यांची नोकरी संकटात; महामंडळाकडून कारवाई सुरू

Big News : आंदोलन करणाऱ्या ST कर्मचाऱ्यांची नोकरी संकटात; महामंडळाकडून कारवाई सुरू

बसवरील सीटवर बसले असताना अचानक त्याना आकडी आली व  ते बेशुद्ध झाले.

बसवरील सीटवर बसले असताना अचानक त्याना आकडी आली व ते बेशुद्ध झाले.

ST संपाची आतापर्यंतची मोठी बातमी समोर आली आहे.

मुंबई, 10 नोव्हेंबर : ST संताप सहभागी झालेल्या कर्मचाऱ्यांवर (ST Employee) एसटी महामंडळाकडून कडक कारवाई करण्यात येणार असल्याचं वृत्त समोर आलं आहे. राज्यभरात सुरू असलेलं एसटी कामगारांचं आंदोलन (Protest of ST employees) चिघळलं असून मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनंतरही ते आंदोलन मागे घेण्याच्या मनस्थितीत नसल्याचं दिसून येत आहे.

यादरम्यान अनेक कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात आली. त्यातही संपात सहभागी झालेल्या कर्मचार्‍यांवर कडक कारवाईची एसटी महामंडळाची तयारी सुरू आहे. निलंबनानंतर आता कायमस्वरूपी कामावरून काढून टाकण्याची कारवाई होणार असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय करून संपावर गेलेल्या एसटी कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी नोकरी गमवावी लागणार असं चित्र आहे.

एसटी महामंडळ कडक पाऊल उचलण्याच्या तयारीत असल्याचं दिसून येत आहे.

हे ही वाचा-ST Employees Strike: विश्रांतीगृहाला टाळं ठोकत कर्मचाऱ्यांना काढलं बाहेर

चंद्रपूरातही एसटी कर्मचाऱ्यांवर कारवाई

चंद्रपूर जिल्ह्यातील एसटीच्या आणखी 15 कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली. काल 14 कर्मचाऱ्यांचे निलंबन करण्यात आले होते. वरोरा 9, चिमूर 4- विभागीय कार्यशाळेतील एकाचा समावेश आहे. संप दडपण्यासाठी प्रशासनाची कारवाई जारीच असल्याचं दिसत आहे.

मा. उच्च न्यायालयाच्या आदेशाचा भंग केल्याप्रकरणी सुमारे ३४३ संपकरी कर्मचार्‍यांच्या विरोधात अवमान याचिका एसटी महामंडळाने आज दाखल केली. यावर संबंधितांना येत्या शुक्रवारी प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देश मा.उच्च न्यायालयाने दिले आहेत. पुढील सुनावणी १५ नोव्हेंबर रोजी होणार आहे.

First published:

Tags: Mumbai, ST