मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /BREAKING : संपकरी एसटी बस कर्मचाऱ्यांवर अखेर कारवाई, 376 जण निलंबित

BREAKING : संपकरी एसटी बस कर्मचाऱ्यांवर अखेर कारवाई, 376 जण निलंबित

 विलीनीकरणाच आंदोलन सुरू झाल्यापासून नांदेड जिल्ह्यात हा तिसरा बळी गेला.

विलीनीकरणाच आंदोलन सुरू झाल्यापासून नांदेड जिल्ह्यात हा तिसरा बळी गेला.

अनिल परब यांनी कर्मचाऱ्यांना कामावर रूजू होण्याची विनंती केली होती. पण, संघटना लेखी आश्वासनाशिवाय मागे हटण्यास तयार नाहीत.

मुंबई, 09 नोव्हेंबर : एसटी महामंडळ (st bus maharashtra) राज्य सरकारमध्ये विलगीकरणाच्या मागणीसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी बेमुदत संप (st bus workers strike) पुकारला आहे. राज्य सरकारने काही अटी मान्य केल्या आहे. पण, तरीही संघटना आंदोलनावर ठाम आहे. त्यामुळे आता राज्य सरकारने कारवाईचा बडगा उगारत 376 संपकरी कर्मचाऱ्यांवर निलंबनाची (suspended) धडक कारवाई करण्यात आली आहे.

गेल्या काही दिवसांपासून एसटी कर्मचारी बेमुदत आंदोलनावर गेले आहे. राज्यातील अनेक डेपो बंद आहे. त्यामुळे ऐन दिवाळीच्या काळात प्रवाशांना अतोनात हाल सहन करावे लागले. या प्रकरणी समिती स्थापन करण्यात आली आहे. तसंच, हायकोर्टातही या प्रकरणाची सुनावणी सुरू आहे. परिवहन मंत्री अनिल परब यांनी कर्मचाऱ्यांना कामावर रूजू होण्याची विनंती केली होती. पण, संघटना लेखी आश्वासनाशिवाय मागे हटण्यास तयार नाहीत.

भयंकर! भटक्या कुत्र्यांचा चिमुकलीवर हल्ला, तोडले लचके; पाहा VIDEO

अखेर राज्य सरकारने कठोर पाऊल उचलत 376 संपकरी कर्मचाऱ्यांना निलंबित केले आहे. एकाच दिवसात एसटी महामंडळाची संपकरी कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई झाली आहे. राज्यातील 45 डेपोतील 376 कर्मचारी निलंबित करण्यात आले आहे.

चंद्रपुरात 36 कर्मचारी निलंबित

तर चंद्रपूर जिल्ह्यातील संपकरी एसटी कर्मचाऱ्यांवर प्रशासनाने कारवाई केली आहे.  14 संपकरी एसटी कर्मचाऱ्यांचे प्रशासनाने निलंबन केले आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील राजूरा आगार- चंद्रपूर आगार आणि विभागीय कार्यशाळा या 3 घटकातील 14 कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. दिवाळीआधी एसटी कर्मचाऱ्यांच्या संपानंतर चंद्रपूरातूनच अनिश्चित कालीन संपाची सुरुवात झाली होती, चंद्रपूर जिल्ह्यातील एसटी कर्मचाऱ्यांवरील कारवाईच्या घटनेने कर्मचाऱ्यांमध्ये संतापाची लाट पसरली आहे.

First published: