• Home
  • »
  • News
  • »
  • mumbai
  • »
  • BREAKING : राज ठाकरे शरद पवारांसोबत घेणार मुख्यमंत्र्यांची भेट, मोठा निर्णय होणार!

BREAKING : राज ठाकरे शरद पवारांसोबत घेणार मुख्यमंत्र्यांची भेट, मोठा निर्णय होणार!

BREAKING : 'एसटी कर्मचाऱ्यांचे प्रश्न शरद पवार यांच्या कानावर घातले असून लवकरच राज ठाकरे व शरद पवार दोघेही मुख्यमंत्र्यांना यासंदर्भात भेटतील'

BREAKING : 'एसटी कर्मचाऱ्यांचे प्रश्न शरद पवार यांच्या कानावर घातले असून लवकरच राज ठाकरे व शरद पवार दोघेही मुख्यमंत्र्यांना यासंदर्भात भेटतील'

'एसटी कर्मचाऱ्यांचे प्रश्न शरद पवार यांच्या कानावर घातले असून लवकरच राज ठाकरे व शरद पवार दोघेही मुख्यमंत्र्यांना यासंदर्भात भेटतील'

  • Share this:
    मुंबई, 12 नोव्हेंबर : एसटी महामंडळ राज्य सरकारमध्ये (mva government) विलगीकरण घेण्याच्या मागणीसाठी एसटी कर्मचारी बेमुदत संपावर (st bus strike ) आहे. पण, अद्याप या संपावर कोणताही तोडगा निघालेला नाही. आज मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे(raj thackery) यांनी पुढाकार घेत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (sharad pawar) यांचे निवास्थान गाठले. त्यांच्यासोबत चर्चा केल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (cm uddhav thackery) यांची भेट घेण्याचे ठरले आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज संध्याकाळी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक या निवास्थानी जाऊन भेट घेतली. यावेळी बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाईसह इतर नेते सोबत होते. या बैठकीनंतर नितीन सरदेसाई आणि बाळा नांदगावकर यांनी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना माहिती दिली. प्रजेला मोफत निरोध वाटणारा CONDOM KING, सोबत देतो मोलाचा संदेश 'एसटी कर्मचाऱ्यांचे प्रश्न शरद पवार साहेबांच्या कानावर घातले. इतर महामंडळांप्रमाणे सातवा वेतन एसटी महामंडळाला लागू करण्याची मागणी केली. केवळ एसटी प्रश्नावर चर्चा केली. ते तोडगा काढतील अशी अपेक्षा आहे, असं बाळा नांदगावकर यांनी सांगितलं. तसंच, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची सर्जरी झाल्यानं राज ठाकरे यांनी शरद पवारांना भेटायला आहे. फायनान्सचा विषय असल्यानं पवारांना भेटलो. ते मार्ग काढतील असं वाटतंय. राज ठाकरे व शरद पवार दोघेही मुख्यमंत्र्यांना यासंदर्भात भेटतील, अशी माहितीही बाळा नांदगावकर यांनी दिली. कंगनाचे विधान चुकीचेच पण मोदी सरकारविषयी तिचे वक्तव्य बरोबर -चंद्रकांत पाटील शरद पवारांशी सकारात्मक चर्चा झाली. प्रत्येकवेळी लोकांनी शिवतीर्थावर येवून राज ठाकरेंना भेटायला हवं का? त्यांच्याकडे आलेल्या विषयाचा ते पाठपुरावा करतात. गंभीर विषय असल्यानं ते लगेच पवार साहेबांना भेटायला आले.  सातवा वेतन आयोग लागू केल्यास त्यांचा पगारवाढ होईल. मग ते संप मागे घेतील, असंही नांदगावकर यांनी सांगितलं.
    Published by:sachin Salve
    First published: