केनिया, 12 नोव्हेंबर: स्वतःचे पैसे खर्च (Story of a person known as condom king) करून लोकांना निरोध वाटणाऱ्या एका व्यक्तीनं जगासमोर एक निराळा आदर्श प्रस्थापित केला आहे. लोकांमध्ये अधिकाधिक (Distributes condom to spread awareness) जागरुकता निर्माण करणं आणि जीवघेण्या आजारांपासून त्यांना वाचवण्याचा विडाच त्यांनी उचलला आहे. नागरिकांमध्ये कंडोमविषयी असणारे गैरसमज दूर करण्याच्या हेतूने त्यांनी ही मोहीम सुरू केली होती.
केनियाचे रहिवासी असणारे स्टॅनली गारा हा असा राजा आहे, जो आपल्या प्रजेला कंडोम वाटत फिरण्यासाठी ओळखला जातो. भेटेल त्या प्रत्येकाला तो कंडोम देतो आणि त्याचा वापर करण्याचा सल्लाही देतो. अफ्रिकेत दर वर्षी हजारो लोक एचआयव्हीला बळी पडतात. अनेक नागरिकांचा त्यात मृत्यू होतो. हे मृत्यू रोखण्यासाठी कंडोम हाच एकमेव उपाय असल्याचं स्टेनली यांचं मत आहे.
मित्राचा झाला होता मृत्यू
स्टेनली यांच्या मित्राचा काही वर्षांपूर्वी एचआयव्हीने मृत्यू झाला होता. त्यावेळी आपल्या मित्राने कंडोमचा वापर केला असता, तर त्याचा जीव वाचू शकला असता, हे स्टॅनली यांच्या लक्षात आलं. यापुढे कुणाचाही जीव केवळ कंडोम वापरलं नाही, या कारणासाठी जाऊ नये, या उदात्त भावनेतून त्यांनी समाजात जनजागृतीला सुरुवात केली. संपूर्ण अफ्रिकेतील नागरिकांमध्ये शक्य तेवढी जनजागृती करण्यासाठीच आपण आपलं आयुष्य खर्ची घालणार असल्याचं त्यांनी ठरवलं आहे.
अनेक आजारांपासून मुक्ती
कंडोममुळे अनेक जीवघेण्या आजारांपासून संरक्षण मिळतं. त्याचप्रमाणे अपघाती प्रेग्नन्सी आणि त्यानंतर होणारा गर्भपाताचा त्रासदेखील टळतो, असा प्रचार ते करतात. त्यासाठी ते स्वखर्चाने कंडोम खरेदी करतात आणि लोकांमध्ये वाटतात. त्यांच्या या उपक्रमाचं जौरदार कौतुक होत असून जनजागृतीसाठी याचा उपयोग होत असल्याचं चित्र आहे.
हे वाचा- उत्तर कोरियात विचलीत करणारी स्थिती, कैद्यांना उपाशीपोटी करावे लागतात कष्ट
कंडोमबाबत उदासीनता
नॅशनल हेल्थ स्टॅटिस्टिकनं जारी केलेल्या आकडेवारीनुसार 2011 ते 2015 या कालावधीत जगातील केवळ 33.7 टक्के नागरिकच निरोध वापरत असून इतर सर्व त्याबाबत उदासीन असल्याचं दिसतं. हे चित्र बदलून अधिकाधिक नागरिकांना कंडोमच्या फायद्यांविषयी माहिती देणं आणि त्यांना कंडोमच्या वापरासाठी उद्युक्त करणं, हेच आपलं जीवितकार्य असल्याचं स्टॅनली सांगतात.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.